घरमहाराष्ट्रआधी अजित पवारांवर कारवाई करा

आधी अजित पवारांवर कारवाई करा

Subscribe

मोहिते-पाटील यांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर

सोलापूर जिल्हा परिषदेतील जयसिंह मोहिते-पाटील गटाच्या राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये जयसिंह मोहिते-पाटील कुटुंबातील दोन सदस्यांसह सहा जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे. यावरून मोहिते पाटील गट चांगलाच आक्रमक झाला आहे. आधी अजित पवारांवर कारवाई करा, मगच आमच्या सदस्यांना निलंबित करा, अशी टीका जयसिंह मोहिते पाटलांनी केली आहे.

पक्षाच्या विरोधी भूमिका घेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार्‍या अजित पवारांवर कोणती कारवाई केली. अडीच वर्षांपूर्वी संजय शिंदे भाजपकडून जिल्हा परिषद अध्यक्ष ज्यांनी दगाबाजी केली, त्यांच्यावर कोणती कारवाई केली. दिपक साळुंखे यांचा विधान परिषद निवडणुकीत कोणी मतदान केलं नाही, राष्ट्रवादीच्या सदस्यांवर कोणती कारवाई केली, असे अनेक प्रश्नही जयसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित केले आहे. याबाबत आधी पक्षाने उत्तरे द्यावीत. तसेच आम्हाला अद्याप कोणत्याही कारवाईचे लेखी पत्र मिळालेले नाही, असेही मोहिते पाटील म्हणाले.

- Advertisement -

सोलापूर जिल्हा परिषदेसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी 31 डिसेंबरला मतदान झाले होते. यात पुरेसे संख्याबळ असताना सुद्धा राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 6 सदस्यांनी विरोधी गटाला मतदान केले होते. सहा सदस्यांनी विरोधी गटाला मतदान केल्याने राष्ट्रवादी आणि महाविकासआघाडीचा प्रयत्न फसला.

जिल्हा परिषदेतील मतदानात या सहा सदस्यांनी भाजप आणि महाविकासआघाडीच्या उमेदवाराला मतदान केले. निलंबित केलेले सर्व सहा सदस्य हे माळशिरस तालुक्यातील असून स्वरूपाराणी मोहिते, शीतलदेवी धैर्यशील मोहिते, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले, अरुण तोडकर, गणेश पाटील या सदस्यांचा यात समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -