घरमहाराष्ट्रदारु सोडण्याचे औषध घेत असाल तर सावधान

दारु सोडण्याचे औषध घेत असाल तर सावधान

Subscribe

दारु सोडण्याचे औषध प्यायल्याने नांदेडमधील हदगावात तालुक्यात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

एखाद्या व्यक्तीला दारुचे व्यसन असल्यास त्याचे संपूर्ण कुटुंब उद्वस्त होते. मग त्या व्यक्तीची दारु सोडण्यासाठी घरातले सदस्य वेगवेगळे उपाय देखील करतात. मात्र या घरगुती उपचारामुळे एखाद्याचा जिव देखील जाण्याची शक्यता असते. अशीच एक घटना नांदेडमधील हदगाव तालुक्यात घडली आहे. दारु सोडण्याचे औषध प्यायल्याने दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने हदगावात खळबळ उडाली आहे.

नेमके काय घडले?

बीडमधील परळी तालुक्यात राहणाऱ्या दोन भावांने दारु सोडण्याचे औषध प्यायल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. संजय मुंडे (३८) आणि विजय मुंडे (३५) अशी या दोघांची नावे असून हे दोघे भाऊ असल्याचे समोर आले आहे. हदगावात दारुचे व्यसन सोडवण्यासाठी गुरुवारी घरगुती उपचार करणाऱ्या एका व्यक्तीकडे ते गेले होते. दोघांनाही दारुचे व्यसन सोडवण्यासाठी दिलेले औषध ते प्यायले. मात्र काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि काही तासांमध्येच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने हदगावात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

- Advertisement -

वाचा – ऑनलाईन दारु मागवताय मग सावधान…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -