रक्ताच्या तुटवड्यासाठी छोटी शिबिरं घ्या – राजेंद्र शिगणे

मुंबईसह ठाण्यात १५ ठिकाणी छोटी रक्तदान शिबिरे भरवण्याचा एफडीए आयुक्त डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा निर्णय

Mumbai
rajendra shhingane
रक्ताच्या तुटवड्यासाठी छोटी शिबिरं घ्या - राजेंद्र शिगणे

करोना संसर्गाच्या भीतीतून नियमित रक्तदात्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे, मुंबईसह महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी रक्तदान शिबिरे आयेाजित करण्याचे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, भविष्यातील रक्ताची निकड लक्षात घेऊन मुंबई आणि ठाणे येथील १५ ठिकाणे निवडून त्या ठिकाणी रक्तदात्यांनी छोटी रक्तदान शिबिरे आयोजित करावी, असा निर्णय अन्न आणि प्रशासन मुंबई विभागाचे आयुक्त डॉ. राजेंद्र शिगणे यांनी घेतला. याबत मंगळवारी डॉ. राजेंद्र शिगणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई आणि ठाणे येथील रक्तपेढयांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी २५ रक्तपेढ्यांच्या प्रमुख प्रतिनिधींनी या बैठकीत रक्तपेढयांबाबतच्या समस्या मांडल्या.

‘करोना’ प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. त्यामुळे, रक्तदानाच्या सामूदायिक शिबिरांचा उपक्रम बंद करण्यात आला आहे. अशावेळेस जनकल्याण रक्तपेढीला रक्तपिशव्यांचा तुटवडा भासू लागला आहे. सध्या जवळपास २० दिवस पुरेल इतका रक्तसाठा उपलब्ध असल्याचे रक्तपेढयांच्या प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले आहे. सध्या संचारबंदीचे कलम १४४ कलम लागू केल्याने रक्त पेढ्यांना रक्त संकलित करण्यासाठी आवश्यक ती उपकरणे मिळणे अडचणीचे होत आहे. शिवाय, केलेले रक्तदान रक्तपेढीपर्यंत पोहोचवण्यास ही अडथळे येत असल्याने रक्तदान शिबिरे आयोजित करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.


हेही वाचा – Coronavirus: मुंबईत करोनाच्या सावटाखाली ५०० पेक्षा जास्त वाहन खरेदी


भविष्यातील रक्ताची गरज पाहता रक्तदान शिबिरे घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, थॅलेसेमिया रुग्ण आणि तातडीच्या शस्त्रकियेसाठी अखंडित रक्त पुरवठा होणे आवश्यक आहे. यात भविष्यातील रक्ताची गरज लक्षात घेऊन मुंबई आणि ठाणे येथील १५ ठिकाणे निवडून त्या ठिकाणी रक्तदात्याला छोटी रक्तदान शिबिरे पोलीस विभागाच्या मान्यतेने आयोजित करण्यात यावी. त्याचबरोबर, अशी रक्तदान शिबिरे आयोजित करताना रक्तपेढीने, आयोजकाने संबंधित रक्तदात्याला त्याची ओळख पटवण्यासाठी आणि त्याला रक्तदान शिबिरापर्यंत पोहोचता यावे यासाठी ई मेल, व्हॉट्सअप तो ग्राह्य धरण्याबाबत पोलीस विभागाला कळवावे. तसेच रक्तदान शिबिरे आयोजित करताना रक्तदात्याच्या मास्क आणि सॅनिटायझर देणेबाबत तसेच करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्यात यावी, अशा सुचना यावेळी अन्न आणि प्रशासन मुंबई विभागाचे आयुक्त डॉ. राजेंद्र शिगणे यांनी उपस्थित रक्तपेढयांच्या प्रतिनिधी दिल्या आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here