घरमहाराष्ट्र...अखेर सरकारला ‘हवा’ समजली

…अखेर सरकारला ‘हवा’ समजली

Subscribe

हवामान बदलांच्या अभ्यासासाठी टास्कफोर्स

राज्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या वातावरणातील बदलांमुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पूर तर काही ठिकाणी दुष्काळास सामोरे जावे लागले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होत असून याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे.

राज्यातील हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करुन त्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियामक मंडळाची (गव्हर्निंग बॉडी) तर आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे मानवी आरोग्यावर वातावरणातील बदलांचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करुन राज्याचा कृती आराखडा तयार करण्याकरिता राज्यस्तरीय नियामक मंडळ आणि टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्य सरकारतर्फे शुक्रवारी या टास्कफोर्सची घोषणा करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मंडळाचे अध्यक्ष असून आरोग्य विभागाचे प्रधान सचिव त्याचे उपाध्यक्ष आहेत. संचालक आरोग्य सदस्य सचिव असून राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागीय संचालक सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. राज्यस्तरीय नियामक मंडळाची बैठक वर्षातून एकदा घेण्यात येईल. तर टास्क फोर्सची बैठक वर्षातून तीन वेळा घेण्यात येणार आहे.

जिल्हास्तरावर देखील जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य सचिव असून जिल्हा सर्वेक्षण अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे सदस्य, जिल्हा कृषी अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रतिनिधी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रतिनिधी, जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

असे असेल टास्क फोर्सचे काम

टास्क फोर्स मार्फत हवामान बदलाचा आणि मानवी आरोग्यावर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करुन राज्याचा कृती आराखडा तयार करण्यात येईल. या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य आणि जिल्हा टास्क फोर्सवर असणार आहे. त्यामध्ये हवामान बदलामुळे होणारे आजार ओळखणे, त्यांचे सर्वेक्षण करुन जोखीम निश्चित करणे, जोखीमग्रस्त भाग व लोकसंख्या निश्चित करुन त्यानुसार कार्ययोजना आखणे, उपलब्ध संसाधनांची यादी करणे आदी बाबी टास्क फोर्स करणार आहे, असे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -