घरमहाराष्ट्रदुसरी खासगी तेजस एक्स्प्रेस अहमदाबाद -मुंबई -अहमदाबाद धावली

दुसरी खासगी तेजस एक्स्प्रेस अहमदाबाद -मुंबई -अहमदाबाद धावली

Subscribe

एसी चेयर कारचे भाडे- 1 हजार 659 रुपये,एक्जिक्युटिव्ह एसी चेअरचे भाडे- 5 हजार 470 रुपये

देशातील पहिल्या खासगी तेजस एक्स्प्रेसनंतर अहमदाबाद ते मुंबई दरम्यान दुसरी खाजगी तेजस शुक्रवारी सकाळी धावली. या गाडीला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी हिरवा झेंडा दाखवला. मात्र या या गाडीला रेल्वे कर्मचारी संघटनेने तीव्र विरोध केल्यामुळे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. सुरूवातीला या एक्स्प्रेसमध्ये गुजराती संस्कृतीचे दर्शन घडणार होते. परंतु, मराठीगुजराती वाद उफाळल्यानंतर आयआरसीटीसीने याची दखल घेतली. त्यानंतर गुजराती साज चढवून तेजस मुंबई सेंट्रलला आली आणि मराठी थाटात अहमदाबादला रवाना झाली.

अहमदाबाद – मुंबई खाजगी तेजस ट्रेनचे उद्घाटन रेल्वे मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार होते. मात्र खासगी ट्रेन म्हणून रेल्वे कर्मचारी संघटनेचा विरोध आणि त्यात गुजराती-मराठी वादामुळे तेजस एक्सप्रेस वादाच्या भोवर्‍यात सापडली होती. तेजसच्या विरोधात सकाळपासून अहमदाबाद आणि मुंबईत सेंट्रल येथे वेस्टर्न रेल्वे मजदूर संघाने तीव्र निदर्शने केली. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी अहमदाबाद रेल्वे स्थानकावर अनेक आंदोलनकर्त्यांना अटक सुध्दा केली आहे. मात्र,अखेर तेजस एक्स्प्रेस सकाळी 10 .40 वाजता मुंबईत आली. अहमदाबादमध्ये या तेजस एक्स्प्रेसला पाहण्यासाठीसुध्दा प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.यावेळी गुजरातची लोककला असलेले गरबा नृत्यस अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर सादर करण्यात आले.

- Advertisement -

प्रवासी क्षमता

तेजस एक्स्प्रेसची प्रवासी क्षमता 736 असणार आहे. यात दोन एक्झिक्युटिव्ह चेअर कार असणार आहेत. तर 8 कोच हे एसी चेयर कारचे असणार आहेत. प्रत्येक एक्झिक्युटिव्ह डब्यात 56 प्रवाशांची क्षमता आहे. त्यामुळे दोन डब्यात 112 प्रवासी हे एक्जिक्युटिव्ह चेअर कारचे असणार आहेत. एसी चेयर कारचे प्रत्येक डब्यांची क्षमताही 78 प्रवाशांची आहे. त्यामुळे 8 कोचमध्ये 624 प्रवासी हे एसी चेयर कारचे असणार आहेत.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -