घरमहाराष्ट्रभीषण वास्तव : हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांमध्ये हाणामारी

भीषण वास्तव : हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांमध्ये हाणामारी

Subscribe

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पाणी टंचाईचे विदारक चित्र दिसत आहे. एक हंडा पाण्यासाठी महिलांना आपापसात संघर्ष करावा लागत आहे.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी तालुक्यातील ग्रामीण परिसरात पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. खळबळजनक बाब म्हणजे भिवंडी येथे एका हंडाभर पाण्यासाठी दोन आदिवासी महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे जिल्ह्यातील पाणीपुरवठा विभागासह स्थानिक लोकप्रतिनिधीचे पाणी टंचाई मुक्तीचे दावे फोल ठरल्याचे दिसून आले आहे.

हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांमध्ये हाणामारी

हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांमध्ये हाणामारी

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 20, 2019

- Advertisement -

 

भीषण पाणी टंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी दोन आदिवासी महिलांनामध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील मैदे गावातील असल्याचे समोर आले आहे. मैदे गावात दिवसभरातून चार किंवा पाच हंडे नळाला पाणी येते. त्यासाठी या महिला नळावर नंबर लावून ठेवत असतात आणि पाणी आल्यानंतर जेमतेम चार हंडे पाणी ज्यांना मिळालं तर ठीक नाहीतर दोन ते तीन किलोमीटर दूरवर पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पाण्यासाठी भटकंती नको म्हणून नळावर सर्वात आधी नंबर लावण्यात येतो. त्यातच हंडाभर पाणी भरण्याच्या वादात दोन आदिवासी महिलांमध्ये हाणामारी झाली. या घटनेचे एका स्थानिक ग्रामस्थाने आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये संपूर्ण घटना कैद करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पाणी टंचाईचे भयाण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.

- Advertisement -

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मुरबाड, शहापूर, भिवंडी तालुक्यातील ग्रामीण परिसरात भीषण टंचाईमुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन दिवसापूर्वीच अंगाला हळद लागलेल्या अवस्थेत नवरी मुलीला एक हंडाभर पाण्यासाठी तळ गाठलेल्या विहिरीवर तासभर ताटकाळत राहावे लागल्याची घटना समोर आली होती. वर्षोनुवर्षे जिल्ह्यातील ग्रामीण परिसरात पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलांना दिवस-रात्र पाण्यासाठी भटकंती करावे लागत असल्याचे चित्र आजही दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -