घरताज्या घडामोडीठाकरे सरकार महिलांचे संरक्षण करण्यामध्ये अपयशी - दानवे

ठाकरे सरकार महिलांचे संरक्षण करण्यामध्ये अपयशी – दानवे

Subscribe

ठाकरे सरकारला काल (शनिवार) एकवर्ष पूर्ण झाले. पण ठाकरे सरकारने या एका वर्षात केलेल्या कामावर विरोधी पक्षातील नेते टीका करत आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तीन पक्षांनी एकत्र येऊन जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. तसेच ठाकरे सरकार महिलांचे संरक्षण करण्यामध्ये अपयशी ठरले आहे, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

दानवे म्हणाले की, ‘हे पक्ष जेव्हा निवडणूकीत उतरले होते तेव्हा प्रत्येकाने आपला जाहीरनामा वेगवेगळा केला होता.
प्रत्येकाच आश्वासन वेगळं होत. परंतु हे जे सरकार आहे ते निवडणुकीनंतर अकुत्रिम प्रकारचे सरकार आले आहे. आमचा मित्र पक्ष भारतीय जनता पक्षाला सोडून राष्ट्रवादीसोबत गेला. जाताना त्यांनी एकच सांगितलं होतं की, भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री पदाच आश्वासन दिलं होत, अशाप्रकारचं आश्वासन भारतीय जनता पक्षाने दिलं नव्हते. परंतु हे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री पदाच आश्वासन दिलं हे असं जे खोट सांगतायत ते लक्षात ठेवायचं नाही. पण त्यांनी जे बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होत, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना बागायतील ५० हजार रुपये द्या, हे आश्वासन त्यांच्या लक्षात राहिल नाही. त्यामुळे या सरकारची कामगिरी पूर्णपणे असमाधानकारक आहे.’

- Advertisement -

पुढे दानवे म्हणाले की, ‘आपण पाहत असाल या राज्यामध्ये महिल्यावरील अत्याचार वाढलेत. महिला सुरक्षित नाही आहेत. सातत्याने महिलांच्या अत्याचारामध्ये वाढ होत आहे. राज्यामध्ये विविध ठिकाणी महिलाच्या छडेछाडच्या आणि बलात्कारच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हे सरकार महिलांच संरक्षण करण्यामध्ये अपयशी ठरले आहे. दरम्यान कोरोनाच्या काळात गुन्हेगाराला कोर्टाकडून जामीन मिळू लागला. पण ज्यांनी महिलांची छेडछाड किंवा बलात्कार केला आहे, अशा गुन्हेगारांना या काळातही जामीन मिळू नये, अशी मागणी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली. मात्र सरकारने त्यांना जामीन दिला. महिला प्रती या सरकारचे धोरण उदासीनतेचे होते.’

‘त्याच पद्धतीने राज्यातील शिक्षणांचा बट्याबोळ झाला आहे. रखडलेले शालेयत्तर माध्यमिक प्रवेश कोणत्या निकषावर द्यायचे. याच उत्तर अद्यापही सरकारकडून आलेले नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होणार कधी? सरकारी सेवा दलात जागा बनणार कधी? याचे उत्तर या राज्य सरकारकडे नाही आहे,’ असे रावसाहेब पत्रकार परिषदेत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – तुमच्या पिढ्या संपतील, पण हैदराबादचं भाग्यनगर होणार नाही; ओवैसींचा हल्लाबोल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -