भोसले राजघराण्याच्या ३७३ वर्ष जुना असलेला दुर्बीण बुरुज ढासळला

ऐतिहासिक वारसा असलेल्या या राजवाड्याच्या बुरज ढासल्यामुळे चिंता व्यक्त

पुढील दोन-तीन दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले. दरम्यान या परतीच्या पावसाने राज्यभर कहर केला असून सोलापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. या पावसाचा फटका भोसले राजघराण्यातील अक्कलकोट संस्थानच्या जुन्या राजवाड्याला बसला आहे. ३७३ वर्ष जुन्या राजवाड्याचा बुरुज ढासळला असल्याचे समोर येत आहे.

असा घडला प्रकार

सोलापूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे ३७३ वर्ष जुना असलेल्या भोसले राजघराण्यातील अक्कलकोट संस्थानच्या राजवाड्याला फटका बसला आहे. अक्कलकोट संस्थानचा दुर्बीण बुरूज ढासळला आहे. अतिवृष्टी आणि झाडा झुडपांमुळे दुर्बीण बुरुज कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोट संस्थान गादीची स्थापना पहिले श्रीमंत फत्तेसिंह राजे भोसले यांनी केली होती. अक्कलकोट संस्थानने ३७३ वर्षांपूर्वी हा राजवाडा बांधला होता. छत्रपती शाहू महाराज (संभाजी राजे यांचे पूत्र)यांनी अक्कलकोट संस्थानची १७०७ साली निर्मिती केली होती. या घटनेमुळे अक्कलकोट संस्थानच्या व्यवस्थापकांचे राजवाड्याकडे दुर्लक्ष असल्याचे उघड झाले आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या राजवाड्याच्या बुरज ढासल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारती आणि पूल या ठिकाणची वाहतूक वळवावी किंवा तात्पुरती थांबविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्याचबरोबर, अतिवृष्टी झाल्यास नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे असं आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


पावसामुळे पंढरीत हाहाकार; चंद्रभागेच्या घाटाची भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यू