घरमहाराष्ट्रपुलवामानंतर झालेला एअर स्ट्राईक आमच्या सल्यानुसारच - शरद पवार

पुलवामानंतर झालेला एअर स्ट्राईक आमच्या सल्यानुसारच – शरद पवार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री यांनी आज चाकण येथील सभेत पुलवामा हल्ल्याबाबत मोठा गोप्यस्फोट केला. पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले होते. या हल्ल्याचे श्रेय भाजपचे नेते घेत असतानाच शरद पवार यांनी मीच दशतवाद्यांवर हल्ला करण्याचा सल्ला दिला असल्याचे सांगितले आहे. “पुलवामा हल्ल्यानंतर तातडीने दिल्ली येथे बैठक घेण्यात आली होती. तेव्हा शरद पवार यांना पहिला प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी भारतीय जवानांना दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचे आदेश द्या”, असा सल्ला मीच दिल्याचे पवार म्हणाले. शिरूर उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी अजित पवार, जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे आदी नेते उपस्थित होते.

शरद पवार पुढे म्हणाले की, या बैठकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री बैठकीला उपस्थित नव्हते. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ही बैठक बोलवली होती. या बैठकीला गेल्यावर पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात असल्याचे आम्हाला कळाले. “मैं चौकीदार हु, देश की सुरक्षा मेरे हात मे है. कुछ होणे नहीं दुगा. असे ५६ इंचची छाती यवतमाळ मधून हे बोलत होती, अरे तिकडे जम्मू-काश्मीर मध्ये जायचे, ते हे इथून बोलत होते आणि आम्ही दिल्लीत बैठकीत बसलो होतो”, असा घणाघाती आरोप पवार यांनी आजच्या सभेत केला.

- Advertisement -

तसेच या सभेत शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचे कौतुकही पवारांनी केले. काही तथाकथित इतिहासकारांनी जो इतिहास लिहिला आहे तो वाचा. अमोल कोल्हे यांनी आधी शिवाजी महाराज आणि नंतर संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारून खऱ्या अर्थाने इतिहास पुढे आणण्याचे काम केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -