भीमा नदीच्या काठी आढळला मृतदेह

भीमा नदीच्या पुलाखालील नदीपात्रात आज एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या व्यक्तीची ओळख पटली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Pune
The body was found in a riverbed under the river Bhima
भीमा नदीच्या काठी आढळला मृतदेह

भीमा नदीच्या पुलाखालील नदीपात्रात आज एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. संदीप बबन कवडे (४५) असे या तरुणाचे नाव आहे. ही व्यक्ती पुणे येथील मुंढवा, सायबर सिटी मगरपट्टा येथे राहणारी होती. तसेच अहमदनगर हे त्यांचे मूळगाव असल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – ठाण्यातील दोन बेपत्ता मुलांचे आढळले मृतदेह


शिरुर तालुक्यातील कोरेगाव-भीमा येथील भीमा नदीच्या पात्रात बुधवारी सकाळच्या सुमारास कवडे यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भीमा नदीच्या नवीन पुलावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. मृतदेह आढळल्याची खबर शिक्रापूर पोलिसांना मिळाल्यावर काही स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर ओळखपत्रानुसार तो मृतदेह संदीप बबन कवडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. संदीप कवडे हे मगरपट्टासिटी, हडपसर या ठिकाणी सायबर सिटी या कंपनीत कामाला होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.