परभणीत मतदान केंद्राबाहेर गाडी लावण्यावरुन वाद; पोलिसांची गाडी फोडली

संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांचीच गाडी फोडल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एक जण जखमी झाला आहे.

Parbhani
citizens of Parbhani broke the police car
परभणीत मतदान केंद्राबाहेर गाडी लावण्यावरुन वाद

परभणी लोकसभा मतदार संघामध्ये मतदानाच्या वेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परभणी जिल्ह्यातील शिवडी मतदान केंद्राबाहेर गाडी लावण्यावरुन वाद झाला. संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांचीच गाडी फोडल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एक जण जखमी झाला आहे. त्यामुळे या मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण होते. काही वेळानंतर सुरळीत मतदानाला सुरुवात झाली.

दरम्यान, परभणी लोकसभा मतदार संघात मतदान करताना अडचणी निर्माण होत आहेत. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. पाथरी तालुक्यातील दोन केंद्रावर तर गंगाखेड तालुक्यत एक मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रियेत अडथळे निर्माण झाला आहे. ईव्हीएम मशीन बंद पडत असल्याने वारंवार मतदानात व्यतय येतोय.

जिल्ह्यातील पाथरी शहरात असलेल्या जिल्हापरिषद शाळेतील ईव्हीएम मशीन सकाळी बंद पडले होते. त्या ठिकाणी दुसरी मशीन बसवून मतदानाला सुरवात झाली. तर आता पाथरी तालुक्यातीलच वाघाळा गावातही ईव्हीएम मशिन बंद पडली. तर दुसरकीडे गंगाखेड तालुक्यातील दामपुरी येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडले होते. प्रशासनाच्यावतीने नवीन मशीन देऊन मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली आहे. आशा घटनेमुळे मतदानावर परिणाम होत आहे.