घरमहाराष्ट्रबारावीचा अभ्यासक्रम बदलणार

बारावीचा अभ्यासक्रम बदलणार

Subscribe

राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचा निर्णय; सोशल मीडिया व्यवस्थापन धड्याचा समावेश

यंदाच्या शैक्षणिक वर्षात यंदा दुसरी व अकरावीच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता आगामी शैक्षणिक वर्षामध्ये तिसरी व बारावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. बारावीच्या समाजशास्त्र आणि अन्य विषयांचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. बारावीच्या अभ्यासक्रमात स्त्री-पुरुष समानता, सोशल मीडिया व्यवस्थापन आणि इतर अत्याधुनिक विषयांची भर पडणार आहे.

बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी आम्ही तज्ज्ञांची समिती नियुक्ती केली होती. या समितीने अभ्यासक्रम बदलाबाबत शिक्षण क्षेत्रातील अन्य तज्ज्ञांकडून त्यांच्या शिफारशी मागवल्या होत्या. त्याला शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी उत्तम प्रतिसाद दिला. मंडळाकडे आलेल्या शिफारशींचा समितीने अभ्यास करून अभ्यासक्रमात बदल करण्यास सांगितले होते. त्यानुसार राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्यावतीने बारावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीच्या अभ्यासक्रमात आधुनिक काळातील समस्या, स्त्री-पुरुष समानता, लैंगिक शिक्षण, सोशल मीडिया व्यस्थापन आणि अन्य महत्त्वाच्या विषयावरी धड्यांचा समावेश केला आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर नव्या पिढीसमोरील आव्हाने, पर्यावरण रक्षण, कचरा व्यवस्थापन यासारख्या भविष्यातील गंभीर समस्यांवर तोडगा काढण्याचे ज्ञान विद्यार्थ्यांना कॉलेजमध्येच मिळणे अपेक्षित असल्याने बारावीतील विद्यार्थ्यांना याचे शिक्षण कॉलेजमध्येच देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. तसेच तिसरी इयत्तेतील अभ्यासक्रमातील आधुनिक भारत व इकोफ्रेंडली पद्धतीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. जग झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे राज्य मंडळातून शिक्षण घेणारे विद्यार्थी अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडू नयेत. तसेच जागतिक परीक्षांमध्ये त्यांचा निभाव लागावा ही बाब ग्राह्य धरून बालभारतीकडून अभ्यासक्रमात करण्यात येणार्‍या सुधारणा योग्य असल्याचे मत पालकांकडून व्यक्त करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -