‘पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीची संख्या वाढली’

पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. तसेच मनुष्यबळ आणि अपुरी वाहन संख्या ही डोकेदुखी आहे.

Pune
The crimes rate increased in Pimpri-Chinchwad says R.K.Padmanabhan
पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन

स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होऊन १५ ऑगस्टला एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, गुन्हेगारीचा चढता आलेख हा कमी होताना दिसत नाही. स्वतः पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी गुन्हेगारी वाढल्याचे मान्य केले आहे. तर दुसरीकडे मनुष्यबळ आणि वाहनांसाठी पोलीस आयुक्त शासन दरबारी झगडत आहेत. यावर्षी खून-६९, खुनाचा प्रयत्न-८६, बलात्कार-११८, दरोडा-३२, जबरी चोरी-३५७ आणि विनयभंग ४६९ अशी या वर्षांची गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. अनेक प्रयत्नानंतर स्वतंत्र पोलीस आयुक्तालय पिंपरी-चिंचवड शहराला मिळाले. प्रथम पोलीस आयुक्त म्हणून आर.के. पद्मनाभन यांनी पदभार स्वीकारला.

अधिकाऱ्यांची गटबाजी हे लागले दिसू

पहिल्या काही महिन्यात त्यांनी आयटी पार्ककडे जाणाऱ्या मार्गावर बदल करून आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली. मात्र, त्यानंतर अंतर्गत वाद, अधिकाऱ्यांची गटबाजी हे दिसू लागले. यामुळे पोलीस कर्मचारी नाराज असल्याचे चित्र वारंवार समोर आले आहे. तर दुसरीकडे वाहनतोड फोडीचे सत्र, खून, दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न या घटनांनी चांगलंच तोंडवर काढले आहे. यामुळे शहरातील वातावरण भीतीयुक्त झाले आहे.

आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्याचे समाधान आहे

दरम्यान, आज पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन म्हणाले की, वर्षपूर्ती होत असताना अनेक अडचणी आल्या. त्यात मनुष्यबळ आणि अपुरे वाहन संख्या याचा समावेश आहे. मात्र, आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्याचे समाधान आहे. सध्या गुन्हेगारी आकडेवारी जर पाहिली तर आकडा जास्त दिसणारच. गुन्हेगारीची संख्या वाढली आहे. कारण आम्ही प्रत्येक गुन्ह्याची नोंद करत आहे. मात्र मोका, तडीपार यासारख्या कारवाई देखील अनेकदा केलेल्या आहेत, असे पोलीस आयुक्त म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here