घरमहाराष्ट्रआंबोलीच्या मातीच्या बंधार्‍याचे काम बंद पाडले

आंबोलीच्या मातीच्या बंधार्‍याचे काम बंद पाडले

Subscribe

ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

परिसरातील आंबोली येथील मातीच्या बंधार्‍याच्या कामाबाबत आक्षेप घेत स्थानिक ग्रामस्थांनी हे काम बंंद पाडले आहे.खारभूमी विभागामार्फत शहरातील मयेकर यांच्या शेताच्या पुढील भागापासून ते आंबोली येथील समशानभूमी परिसरापर्यंत मातीचा मोठा बंधारा बांधण्यात येत आहे. लक्ष्मीखर, तेलवडे आणि आंबोली परिसरातील समुद्राचे पाणी भात शेतीमध्ये शिरू नये यासाठी सदरचा बंधारा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत आहे तेलवडे, शिघ्रे ते आंबोली परिसरातील असंख्य एकर जमीन गेल्या कित्येक वर्षांपासून समुद्राचे पाणी जाऊन नापीक झाली आहे. यासाठी हा बंधारा बांधण्यात येत आहे. आंबोली समशानभूमीपर्यंत काम होत आले असून, आंबोली वरची आळी ग्रामस्थांनी सदरचे काम निकृष्ट दर्जाचे असून, काम सुरू करतेवेळी ग्रामस्थांना विश्वासात न घेता ते सुरू करण्यात आल्याचा आक्षेप घेतला आहे. या सर्वांनी बुलडोझरच्या सहय्याने सुरू असलेले भरावाचे काम बंद पाडले.

बंधार्‍याची उंची या अगोदरच १२ फूट आहे. त्यावरच ठेकेदाराने फक्त सहा इंच मातीचा भराव टाकल्याचे ग्रामस्थ सांगतात. अंदाज पत्रकाप्रमाणे काम होत नसून संबंधित ठेकेदाराने कामाबाबतचे स्पष्टीकरण ग्रामस्थांना देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जोपर्यंत शंकांचे निरसन होत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नसल्याचा पवित्रा सर्व ग्रामस्थांनी घेतला आहे. यावेळी अध्यक्ष महादेव कमाने, मंगेश ठाकूर, मनोज कमाने, संदीप ठाकूर, वसंत खंडागळे, हरी ठाकूर, महेंद्र बैकर, रामजी खंडागळे, जयवंत कमाने, तेजस कमाने आदी उपस्थित होते. दरम्यान, लवकरच ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करणार असल्याची ग्वाही ठेकेदाराने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -