घरमहाराष्ट्रनाशिकसात बारा डिजीटायजेशनसाठी आता डिसेंबर अखेरची मुदत

सात बारा डिजीटायजेशनसाठी आता डिसेंबर अखेरची मुदत

Subscribe

जिल्हयात ऑनलाईनचे ७६ टक्के काम पूर्ण

शेतकर्‍यांना ऑनलाइन सातबारा उतारा उपलब्ध करून देण्याचे अनेक मुहूर्त टळल्यानंतर आता नव्या वर्षात या सेवेला सुरुवात होणार आहे. जिल्हयात अपूर्ण असलेले २४ टक्के काम अपूर्ण असून हे काम पूर्ण करण्यासाठी तसेच यातील त्रुटी दूर करण्यासाठी डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आल्याची माहीती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. नागरीकांना उपलब्ध करून द्यावयाच्या सर्व ५१ सेवा महाऑनलाईन या पोर्टलवरून ऑनलाईन पध्दतीने आणि डिजीटल सिग्नेचर वापरूनच उपलब्ध करून द्यावयाच्या असल्याने जिल्हयातील सर्व महा ई सेवा केंद्र आणि सेतू सेवा केंद्रामार्फत महाऑनलाईन पोर्टलवरून ऑनलाईन पध्दतीने डिजीटल स्वाक्षरी वापरून नागरीकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.

ऑनलाईन सातबारा देण्याचा सरकारचा निर्णय

मात्र ऑनलाईन सात बारा मिळविण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे सातबारा उतारा मिळविण्यासाठी तलाठ्याकडे धाव घ्यावी लागते. गावापासून दूर राहणारे लोक सातबारा घेण्यासाठी गावाकडे गेले तरी त्यांना अनेकदा तलाठीच उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना हेलपाटे मारावे लागतात. सातबारा उतार्‍यासाठी महसूल यंत्रणेकडून अडवणूक होऊ नये याकरीता हे उतारे ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नाशिक जिल्हयात या सेवेची सुरूवातही करण्यात आली. मात्र अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे या सेवेत सातत्य राहू शकले नाही. त्यानंतरही अनेक मुर्हुत निश्चित करूनही ऑनलाईन सात बारा उपलब्ध होऊ शकला नाही.

- Advertisement -

जिल्हयात १२ लाख ४३ हजार ३३३ खातेधारक आहेत. त्यापैकी ९ लाख ३९ हजार ४९ खातेधारकांचे सात बारा उतारे डिजीटल करण्यात आले आहे. याची टक्केवारी ७६ टक्के पुर्ण झाले आहे. अजूनही २४ टक्के काम अपुर्ण आहे. हे काम डिसेंबर अखेरपर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारयांनी दिले आहे. त्यामुळे येत्या नवीन वर्षात ऑनलाईन सात बारा मिळण्याचा मार्ग पूर्ण होणार आहे.

एक लाख उताऱ्यांमध्ये त्रुटी

तीन वर्षांपासून सातबारा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील १२ पैकी ९ लाख सातबारा उतार्‍यांचे संगणकीकरण झाले आहे. मात्र अजूनही सुमारे १ लाख सात बारा उतार्‍यांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटी दूर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संबधितांना दिल्या आहेत.


हेही वाचा-  या कारणांमुळे निष्पाप प्रिन्सचा मृत्यू; शवविच्छेदनातून झाले स्पष्ट
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -