घरमहाराष्ट्रराम मंदिरासाठी संसदेत कायदा बनवण्याची मागणी अयोग्य - यशवंत सिन्हा

राम मंदिरासाठी संसदेत कायदा बनवण्याची मागणी अयोग्य – यशवंत सिन्हा

Subscribe

'संघात बदल होत असल्याचे अधोरेखित होत असतानाच राम मंदिराच्या प्रश्नावर भाष्य करून पूर्वीचा संघ कायम असल्याचे दाखवून दिले आहे. संघाच्या चेह-यात कुठलाही बदल झाला नाही'.

गेल्या १८ ऑक्टोबर रोजी नागपुरात आयोजित संघाच्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा बनवण्यात यावा अशी मागणी केली होती. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे संघाची मागणी अयोग्य असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी आज नागपुरात केले. प्रशांत पवार यांच्या जय जवान-जय किसान संघटनेच्या नागपुरातील कार्यालयात आज, सोमवारी यशवंत सिन्हा, खासदार संजय सिंग आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या राम मंदिरासंदर्भातील विधानावर आक्षेप नोंदवला.

काय म्हणाले सिन्हा ?

यावेळी सिन्हा म्हणाले की, ‘कुठलेही प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यावर संसदेत कायदा बनवण्याची मागणी केली जाऊ शकत नाही. गेल्या काही दिवसांपासून संघात परिवर्तन होत असल्याचे भासवले जाते. गेल्या वर्षभरात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उद्योगपती रतन टाटा आणि नोबेल पुरस्कार विजेते डॉ. कैलास सत्यार्थी यांच्यासारख्या लोकांना संघाने आपल्या व्यासपीठावर आमंत्रित केले’. त्याचप्रमाणे गेल्या महिन्यात दिल्लीतील विज्ञान भवनात डॉ. भागवतांनी देशातील बुद्धीवंतांशी संवाद साधला. संघात बदल होत असल्याचे अधोरेखित होत असतानाच राम मंदिराच्या प्रश्नावर भाष्य करून पूर्वीचा संघ कायम असल्याचे दाखवून दिले आहे. संघाच्या चेह-यात कुठलाही बदल झाला नसल्याचे सिन्हा यांनी सांगितले.

- Advertisement -

शत्रुघ्न सिन्हा यांचे सरकारवर जोरदार टीकास्त्र

यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सीबीआय, ईडी आणि एनआयए सारख्या संस्था समस्येच्या विळख्यात सापडल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सध्या सरकार चार राज्यातील निवडणुकांमध्ये व्यस्त असल्यामुळे यंदाचे संसदेचे हिवाळी अधिवेशन नावापुरतेच राहिल असे भाकित त्यांनी वर्तवले. त्यासोबतच ४ राज्यातील निवडणुकांची निकाल लागल्यानंतर आपली रणनिती स्पष्ट करू असे सिन्हा यांनी सांगितले. यावेळी संजय गांधी यांचे जुने साथीदार असलेले खासदार संजय सिंग यांनी पंतप्रधानांवर महापुरूषांना हायजॅक करण्याचा आरोप लावला. मोदींनी महात्मा गांधी, सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमा आणि प्रतिकांचा स्वतःच्या पक्षासाठी वापर केल्याचे सिगं यांनी सांगितले.

‘आम्ही एकमोकांच्या कामात हस्तक्षेप करत नाही’

भाजप आणि केंद्र सराकारच्या विरोधात शंखनाद करणाऱ्या यशवंत सिन्हा यांना त्यांचे पुत्र जयंत सिन्हा भाजपमध्ये कसे याबाबत विचारले असता सिन्हा म्हणाले की, त्यांचा मुलगा सज्ञान असून आपले निर्णय स्वतः घेतो. आम्ही एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करत नाही. भविष्यात काय होईल हे सांगणे कठीण असले तरी तुर्तास मुलाला आपली भूमिका समजावून देण्यात अपयशी ठरल्याचे त्यांनी मान्य केले.

हेही वाचा – पंतप्रधानांनी देश विकायला काढला आहे – मेधा पाटकर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -