घरदेश-विदेशभाजपला हुकूमशाही आणायची इच्छा

भाजपला हुकूमशाही आणायची इच्छा

Subscribe

मतदार जागृती परिषदेचा एकसूर

देशातील सत्ताधारी पक्ष भाजपला लोकशाहीपेक्षा मनुवादी हिंदू राष्ट्र प्रिय आहे, त्या हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांना हुकूमशहा हिटलर आणि मुसोलिनी यांची वाट धरायची आहे, असा एकसुरी आरोप पुण्यात आयोजित मतदार जागृती परिषदेच्या वतीने आयोजित ‘लोकसभा निवडणूक आणि देशासमोरचे आव्हान’ या विषयावरील सभेत उपस्थित वक्त्यांच्या भाषणातून निघाला.

भाजपचा आदर्श हिटलर आणि मुसोलिनी आहे. या सरकारने त्यांच्या पावणे पाच वर्षांच्या कालखंडात केवळ भांडवलशाहीला मजबूत केले, त्याला अनुसरून निर्णय घेतले. मात्र, त्याच वेळी सर्वसामान्यांच्या हिताकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, अशा शब्दांत या परिषदेत निवृत्त न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला. देशाकडे सरकारचे लक्ष नाही, तसेच सत्ताधारी राजवटीला राज्यघटना अमान्य असल्याचेही सावंत म्हणाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी होते, तर स्वामी अग्निवेश, तीस्ता सेटलवाड, गिरीधर पाटील, निरंजन टकले हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी पी.बी. सावंत म्हणाले, आगामी निवडणूक लक्षात घेता विरोधकांनी एकत्र येऊन आपत्ती दूर केली नाही. विरोधी पक्षांनी योग्य उमेदवार निवडावे. असे सांगत त्यांनी विरोधी एकजुटीला मत देण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

लोकशाहीतील हिटलरचे राज्य
देेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून आजअखेर कोट्यवधी रुपयांचे कर्ज काहींनी बुडवले. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या घटनांवर हे सरकार काहीही ठोस करताना दिसत नाही. मात्र, न्यायव्यवस्था, सीबीआय यांच्या कामामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारंवार हस्तक्षेप असतो. या माध्यमातून लोकशाहीतील हिटलरचा अनुभव येतो, अशा शब्दात साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. मागील 70 वर्षांत ज्या पक्षांची सत्ता होती त्यांच्या कार्यकाळातही अशा घटना घडल्या. मात्र, त्याहून सर्वाधिक घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात घडल्याचेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -