विसापूर किल्ल्यावर अडकलेल्या तरुणाची पाच तासानंतर सुटका

विसापूर किल्ल्यावर अडकलेल्या डॉक्टर तरुणाला शिवदुर्ग टीमने सुखरूप बाहेर काढल्याचे समोर आले आहे. अमर कोरे, असे या डॉक्टर तरुणाचे नाव आहे.

Pimpari-chinchwad
विसापूर किल्ला

विसापूर किल्ल्यावर अडकलेल्या डॉक्टर तरुणाला शिवदुर्ग टीमने सुखरूप बाहेर काढल्याचे समोर आले आहे. अमर कोरे, असे या डॉक्टर तरुणाचे नाव आहे. तो मित्रांसह विसापूर किल्ल्यावर फिरायला गेले होते. तेव्हा तो किल्ल्यावर चढाई करत असताना काही अंतरावर अडकला. त्याला खालीही येता येत नव्हते, तर वरही चढाई करून जात येत नव्हते. त्यावेळी शिवदुर्ग टीमशी संपर्क साधून तब्बल चार ते पाच तासांनी वर काढण्यात आले.

काय आहे घटना 

सविस्तर माहिती अशी की, विसापूर किल्ल्यावर एक तरुण अडकल्याचा फोन कौशिक पाटील यांनी शिवदुर्गला आला होता. तब्बल ८ ते १० तरुण विसापूर किल्ला चढाई करत होते. पहिल्या टप्प्यात सगळे सोबत आले. पण पुढे रस्ता भटकून जंगलात शिरले. नंतर किल्ल्याचा बुरुज वर दिसू लागल्याने थेट बुरुज चढाई करायला सुरू केली. तेव्हा अमर अर्ध्यात अडकला. त्यामुळे तो खाली उतरु शकत नव्हता आणि वरही जाऊ शकत नव्हता. याची माहिती शिवदुर्ग टीमला दिली तसेच सोबत लोकेशन आणि व्हिडिओ पाठवले. भाजे लेणी येथे शिवदुर्गचा सागर कुंभार होता. त्याने टीमसह तिथे तातडीने जाऊन संबंधीत अडकलेल्या डॉक्टर तरुणाला धीर दिला. सागरने त्याला पकडून ठेवलेले होते. सागरच्या व विकासच्या मदतीने अमर उभा राहिला. दोरीच्या आधाराने पकडून सुरक्षित ठिकाणी चालत आला. मग त्याला हार्नेस घातले व सुरक्षित वर काढले. तब्बल चार ते पाच तासांनी त्याला वर काढण्यात टीमला यश आले. विकास मावकर, सागर कुंभार, सागर बाळकुंद्री, पवन म्हाळसकर, दत्ता तनपुरे, रोहित नगिने, हेमंत वाघमारे, निलेश निकाळजे, अनिल आंद्रे, वैष्णवी भांगरे, निकेत तेलंगे,अमित भदोरीया, दिनेश पवार, आनंद गावडे, सुनिल गायकवाड यांनी त्या ठिकाणी जाऊन अडकलेल्या तरुणाला बाहेर काढण्यास मोलाचे योगदान होते.

हेही वाचा –

पुण्यात मोबाइल गेमच्या आहारी गेलेल्या तरुणाची आत्महत्या

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचा राजीनामा; निवडणूक लढण्यासाठी भेटले उद्धव ठाकरेंना

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here