कांदळवनात कचरा टाकणारा डंपर जप्त

‘आपलं महानगर’च्या दणक्याने जाग

Mumbai
डंपर जप्त

वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी कांदळवनावर अमेय लॉजिस्टिकमधील कचरा टाकणारा डंपर रंगेहाथ पकडून जप्त केला आहे. डंपरच्या चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दैनिक ‘आपलं महानगर’मध्ये कांदळवन नष्ट करण्याबाबत 20 एप्रिल रोजी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वन विभागाला जाग आली असून, दोन दिवसांत दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

खोपटा खाडी किनार्‍यावर खारफुटीचे मोठे जंगल आहे. मात्र शेजारील गावातील, तसेच आजूबाजूच्या कारखाने, गोदामातील कचरा या खारफुटीवर टाकून जाळला जातो. यामुळे खारफुटीची शेकडो झाडे मृत झाली आहेत. करंजा-द्रोणागिरी नोड कोस्टल रोडच्या बाजूला, तसेच खोपटा पुलाच्या बाजूला अशा प्रकारे दिवसाढवळ्या खारफुटी जाळण्यात येत आहे. कित्येक महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे.

जप्त केलेला डंपर वन विभागाच्या साजगाव येथील डेपोमध्ये पाठविण्यात आला आहे. उरण परिक्षेत्राचे वनाधिकारी शशांक कदम आणि वनपाल सनी ढोले यांनी ही कारवाई केली.