घरमहाराष्ट्रचंद्रपूर जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा अग्नीरोधक प्रस्ताव ५ वर्षापासून रखडला

चंद्रपूर जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा अग्नीरोधक प्रस्ताव ५ वर्षापासून रखडला

Subscribe

भंडारा अग्नीतांडवाच्या घटनेनं महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरला असताना आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीनंतर राज्यभरात जिल्हा रुग्णालयात असलेल्या अग्निरोधी यंत्रणेची चौकशी सुरु झाली आहे. त्यातच आता चंद्रपूर जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयातील अग्नीरोधक यंत्रणेचा प्रस्ताव २०१६ पासून रखडला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आदिवासी आणि दुर्गम भागातील लोक चंद्रपूर जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयात उपचार घेण्यासाठी जातत. मात्र, या रुग्णालयात अग्नीरोधक यंत्रणेचा प्रस्ताव २०१६ पासून रखडला आहे. भंडारा दुर्घटनेनंतर सर्वच रुग्णालयांच्या अग्नीरोधक यंत्रणेचा आढावा घेतला जात आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अग्नीरोधक यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. यामध्ये ४४ लाख रुपयांचा प्रस्ताव रखडला आहे. हा प्रस्ताव जिल्हा आरोग्य यंत्रणा-सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या दरम्यान पत्रव्यवहार स्तरावर टोलवला जात आहे. यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने माहिती दिली आहे. जिल्ह्याची यंत्रणा सातत्याने याबाबत पाठपुरावा करत असून, प्रत्यक्षात मात्र जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात अग्नीरोधक यंत्रणाच नसल्याचं उघड झालं आहे. दरम्यान, रुग्णालयात नियमानुसार पुरेशी पाणी टाकी उपलब्ध नसल्याने हे काम हळूहळू सुरु आहे. सध्या केवळ हाताने चालवायच्या १५० अग्नीशामक यंत्रांच्या विश्वासावर अग्नीरोधक यंत्रणेचा भार असल्याचं समोर आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बलात्कार पीडितेची ओळख फेसबुकवर केली सार्वजनिक; भाजप खासदाराचा प्रताप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -