नागपुरात पहिला करोना रुग्ण झाला बरा, डॉक्टरांनी दिला डिस्चार्च

नागपुरातील पहिला करोना बाधित रुग्ण ठणठणीत बरा झाला आहे. तसेच या रुग्णाला डॉक्टरांनी डिस्चार्च दिला आहे.

Nagpur
corona
करोना व्हायरस

राज्यात करोना व्हायरसने थैमान घातले असून नागपुरात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नागपुरातील पहिला करोना बाधित रुग्ण ठणठणीत बरा झाला आहे. तसेच या रुग्णाला डॉक्टरांनी डिस्चार्च दिला आहे. त्यामुळे करोनामुळे कोणीही घाबरून जाऊ नका, फक्त स्वतःची काळजी घ्या आणि लॉकडाऊनमुळे काळात घरीच बसणे पसंत करा, असे आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालू नका आणि दुसऱ्यांच्या जीवाला धोका पोहोचवू नका, अशी साथ घालण्यात आली आहे.

नागपुरात आढळून आलेल्या पहिल्या करोना संक्रमित रुग्णाला गुरुवारी दुपारी उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्च देण्यात आला आहे. हा रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी पोहोचलो आहे. ५ मार्चला अमेरिकेतुन नागपुरात आल्यानंतर या रुग्णामध्ये करोनाचे लक्षण दिसून आले. ११ मार्च रोजी या रुग्णाला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्याच्या प्रकृतीमध्ये सतत सुधारणा होत होती. त्याचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. नियमाप्रमाणे आता त्याला १४ दिवस घरात राहावे लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here