घरमहाराष्ट्रमहाआघाडीतून परिवर्तन होणार -अशोक चव्हाण

महाआघाडीतून परिवर्तन होणार -अशोक चव्हाण

Subscribe

भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधी जनतेमध्ये प्रचंड प्रक्षोभ आहे. जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठीच आम्ही महाआघाडी करत असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. भाजपच्या विरोधात विखुरलेले 70 टक्के मतदान एकत्र आणण्यासाठी शरद पवार प्रयत्न करत आहेत. यातुनच परिवर्तन होणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

महाआघाडीच्या संयुक्त सभेत चव्हाण बोलत होते. सत्ता परिवर्तन अटळ आहे. बहुमताच्या जोरावर हम करे सो कायदा ही परिस्थिती गंभीर आहे. जनतेच्या व्यथा ऐकायलाही सरकार तयार नाही. हे सरकार भिकारी झाले असुन, या सरकारकडून जनतेला काहीच मिळणार नाही. आम्ही अजुनही प्रकाश आंबेडकरांची वाट पाहत असल्याचे चव्हाण म्हणाले.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यावर चांगलाच निशाणा साधला. आम्हाला तुरुंगाची भिती नाही, छगन भुजबळ डरणार नसल्याचे ते म्हणाले. तुम्ही मला भ्रष्टाचारी म्हणता, पण तुमच्या लोकांनी तर मुडदे पाडलेत या शब्दात भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना फटकारले.

गोपीनाथ मुंडेंच्या हत्येची चौकशी करु – जयंत पाटील
गोपीनाथ मुंडे हे बीडचे भूमिपुत्र होते. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी आपला नेता गमावल्याचा येथील जनतेचा आक्रोश मी पाहिला आहे. म्हणूनच त्यांची हत्या झाल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशीची मी मागणी केली. यात माझे काय चुकलं ? असे पाटील म्हणाले. गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडेंचे वडील असल्याने त्या या मागणीला पाठिंबा देतील असे वाटले होते. पण, पंकजा मुंडे मलाच शोभते का असे विचारतात. त्यांना कदाचित मर्यादा असतील, सत्ता जास्त महत्वाची असेल. पण आमचं सरकार आले तर गोपीनाथ मुंडेंच्या हत्येची चौकशी करु, असे पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -