Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी साहित्य संमेलनाचा मान नाशिकलाच

साहित्य संमेलनाचा मान नाशिकलाच

पत्रकार परिषदेत घोषणा : मार्चच्या अखेरीस आयोजन

Related Story

- Advertisement -

नाशिक । अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी ९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत केली. हे संमेलन मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या तारखा नाशिककरांशी चर्चा करून निश्चित करण्यात येतील असे पाटील यांनी सांगितले.

साहित्य संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक आणि पुण्याचे एक तसेच अंमळनेरचे एक अशी निमंत्रणे आली होती. पुण्याच्या सरहद संस्थेने फेर निमंत्रण पाठवले होते. साहित्य महामंडळाने स्थळनिवडीचची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंतिमतः नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून ९४ व्या साहित्य संमेलनासाठी त्याची निवड केली आहे.

- Advertisement -

सरहदने संधी हुकवली
दिल्लीच्या मराठी संस्थांनी एकदा त्यांना दिलेले व त्यांनी स्वतःहून नाकारलेले साहित्य संमेलन पुन्हा दिल्लीला व्हावे अशी मागणी केली होती. परंतू सरहदने यंदा संधी हुकवली आहे. परंतु त्यांच्या मागणीचा विचार करून दिल्लीकरांसाठी त्यांची तयारी असेल तर एक विशेख मराठी साहित्स संमेलन देण्याचा विचार महामंडळ करील असे सुचवले होते. तसेच विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनीही त्यांना तसा प्रस्ताव दिला होता. पण सरहदचे निमंत्रक संजय नहार यांनीही हा प्रस्ताव नाकारला त्यामुळे दिल्लीकरांची साहित्य संमेलनाची संधी हुकली.

- Advertisement -