घरताज्या घडामोडीकोकणातील सागरी महामार्गाला लवकरच मिळणार गती

कोकणातील सागरी महामार्गाला लवकरच मिळणार गती

Subscribe

कोकणातील बहुचर्चित सागरी महामार्गाच्या कामकाजास लवकरच गती मिळणार असून चाकरमान्यांना त्याचा फायदा मिळणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

कोकणातील बहुचर्चित सागरी महामार्गाच्या कामकाजास लवकरच गती मिळणार असून चाकरमान्यांना त्याचा फायदा मिळणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या कामांच्या उन्नतीकरणासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करुन सर्वेक्षण करण्यात आले. तसेच प्रारुप आराखडा केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. त्यामुळे लवकरच या प्रारुप आराखड्यास मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रारुप आराखडा केंद्र सरकारकडे पाठवणार

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या सुमारे ५७० किमी लांबीच्या सागरी महामार्गाच्या उन्नतीकरणासाठी (एलीव्हेशन) ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून सर्वेक्षण करण्यात आले आहे. या कामाचा प्रारुप आराखडा मार्च २०१८ मध्ये केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून लवकरच त्याला पुढील परवानगी मिळणार असल्याचे कळते.

- Advertisement -

शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या ५७० किमी लांबीच्या सागरी महामार्गाचा विकास जाणीवपूर्वक रखडवण्यात आल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या महामार्गाचे काम रखडवण्यात आले नाही. केंद्र सरकारकडे सादर केलेल्या प्रारुप आराखड्याला मंजुरी मिळाल्यावर पुढील कार्यवाही हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी भूसंपादनाची प्राथमिक प्रक्रिया हाती घेण्यात आली असून प्रारुप आराखड्याच्या मंजुरीची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचे उत्तरात नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -