घरदेश-विदेशमराठा समाजाकडून पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल

मराठा समाजाकडून पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल

Subscribe

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. पण, आता पुन्हा एकदा मराठा संघटनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाने अर्ज करण्यात आला आहे.

मराठा संघटनेच्या वतीने विनोद पाटील यांच्या वतीने शुक्रवारी ११ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. या अर्जात नागेश्वर राव खंडपीठाने मराठा आरक्षणाला स्थगिती देताना इंद्रा सावनी खटल्याचा दाखला दिलेला आहे. यात सर न्यायाधीशांना विनंती केलेली आहे. इंद्रा सावनी खटल्यामध्ये मागासवर्गीय आरक्षणाबाबत आहे. मराठा आरक्षण हे सामाजिकरित्या, शैक्षणिक मागास हा नवीन प्रवर्ग करून आरक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे या न्यायालयाला स्थगिती देता येत नाही. तसेच या न्यायालयाने प्रकरण पाच न्यायमूर्तींकडे वर्ग केलेले आहे. त्यांना सुनावणी घेण्याचा अधिकार नसल्याने त्यांनी स्थगिती देणे योग्य नाही.

- Advertisement -

या निर्णयामुळे मराठा समाजातील तरुणांचे फार मोठ्या प्रमाणात शैक्षणिक व नोकर्‍यांमध्ये नुकसान होत आहे. सदर प्रकरण विनोद पाटील यांच्या वतीने अ‍ॅड. संदीप देशमुख यांनी अर्ज दाखल केला. तसेच राज्य सरकारने देखील अर्ज दाखल करावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

मराठा आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिला आहे. त्यानुसार वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्यात आले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -