घरमहाराष्ट्रमहापौरांना पोलीस प्रशासनाने पाठवले 'ई-चलन'

महापौरांना पोलीस प्रशासनाने पाठवले ‘ई-चलन’

Subscribe

महापौरांकडून पालिकेच्या नियमांच उल्लंघन झाल्यामुळे पोलीस प्रशासनाने 'ई-चलन' पाठवले.

मुंबईचे प्रथम नागरिक असलेले महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शनिवारी पार्किंगचा नियम मोडला होता. ज्या ठिकाणी रस्ताशेजारी ‘नो पार्किंग’चा बोर्ड लावला होता त्याच ठिकाणी महापौरांची गाडी उभी होती. ‘नो पार्किंग’ झोनमध्ये गाडी उभी केल्यास वाहनाचालकांकडून मोठ्या प्रमाणात पालिकेकडून दंड आकारण्यात येतो. जे सर्वसामान्यांना नियम लागू होतात ते यांना देखील व्हावे म्हणून पोलीस प्रशासानाकडून महापौरांना ‘ई-चलन’ पाठविण्यात आलं आहे.

या सर्व घटनेवर पालिकेच्या अधिकाऱ्यानं असं सांगितलं की, ज्या ठिकाणी महापौर गेले होते. त्या ठिकाणी वाहनतळ नसल्याने ती गाडी हॉटेल बाहेर उभी करण्यात आली. तसेच महापौरांची गाडी ‘नो पार्किंग’ झोनमध्ये उभी करायला नको होती. महापौरांनी या घटनेची कबुली देत म्हटलं की, ‘विलेपार्ल्यातील हॉटेलमध्ये शनिवारी जेवायला गेलो होतो. मी कारमधून उतरुन हॉटेलमध्ये गेलो. त्यादरम्यान चालकानं नेमकी गाडी कुठे उभी केली याची मला कल्पना नव्हती. मात्र कायद्यासमोर सगळे सारखे असतात आणि प्रत्येकानं नियम पाळायलाच पाहिजे,’ असं विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले.

- Advertisement -

नक्की काय घडलं?

शनिवारी मुंबईचे महापौर विलेपार्ल्यातील मालवणी अस्वादमध्ये जेवण्याकरिता गेले होते. हॉटेल बाहेरील ‘नो पार्किंग’ झोनमध्ये गाडी पार्क उभी केली असून त्यांनी पालिकेचे नियमांचे उल्लंघन केले. पालिकेने गेल्या आठवड्यापासून रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या ‘नो पार्किंग’मधील गाड्यांवर मोठी कारवाई केली आहे. मात्र हे असं असताना महापौरांचीच गाडी ‘नो पार्किंग’ झोनमध्ये दिसने हे लांजनास्पद आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने दखल घेतली असून महापौरांना ‘ई-चलन’ पाठवले आहे. त्यामुळे आता महापौर यांना दंड भरावा लागेल आणि हा दंड भरू असे यापूर्वीच महापौरांनी सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -