घरमहाराष्ट्रमोटार वाहन कायद्यातील तरतूदी विरोधात ठाण्यात काँग्रेस कडून जनजागृती

मोटार वाहन कायद्यातील तरतूदी विरोधात ठाण्यात काँग्रेस कडून जनजागृती

Subscribe

ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर आज कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांना कायद्यातील जाचक तरतूदींची दिली माहिती

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या मोटार वाहन कायद्यातील जाचक तरतूदींविरोधात कॉंग्रेसचे नेते रवींद्रनाथ आंग्रे यांनी जनजागृती सुरू केली आहे. ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संपर्क साधत कायद्याविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, या कायद्याविरोधात ठाण्यातील आरटीओ कार्यालयावर उद्या सोमवारी सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे.

मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी देशातील विविध राज्यात केली जात आहे. त्यातून वाहनचालकांची फसवणूक होत आहे. सुस्थितीतील रस्ते सरकारकडून दिले जात नाही. मात्र, जाचक कायद्याची अंमलबजावणी करुन सरकारी तिजोरी भरण्याचा नवा उद्योग सुरू केला आहे, असा आरोप कॉंग्रेसचे नेते रवींद्रनाथ आंग्रे यांनी केला.

- Advertisement -

या संदर्भात राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली जात आहे. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली. मात्र, विधानसभा निवडणूक आटोपल्यावर दंडाची कुऱ्हाड कोसळेल, अशी भीती आंग्रे यांनी व्यक्त केली. या प्रश्नावर जनमत संघटीत करण्यास सुरुवात केली जात आहे. ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर आज कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांना कायद्यातील जाचक तरतूदींची माहिती दिली.


हेही वाचा – ‘आता द्राक्ष आंबट वाटू लागली’; मुख्यमंत्र्यांचे शरद पवारांवर टीकास्त्र
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -