साताऱ्यात २५ लाखांच्या खंडणीसाठी तरूणाची हत्या

साताऱ्यातील नागठाणे येथील २५ लाखांच्या खंडणीसाठी एका युवकाचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

Satara
dead body in well after two months
दोन महिन्यांनी मृतदेह विहिरीत आढळला

घातपात, हत्या, स्फोट अशा घटना तर आता नित्याच्या झाल्या आहेत. खून, दरोडे, अपहरण, खंडणी यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच साताऱ्यातील नागठाणे येथील २५ लाखांच्या खंडणीसाठी एका युवकाचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. अडीच महिन्यांपूर्वी १७ वर्षीय तेजस जाधव या मुलाचे अपहरण झाले होते. गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा छडा लावला आहे.

व्यायाम करण्यासाठी गेला आणि पुन्हा आलाच नाही –

१७ वर्षीय तेजस जाधव सकाळी व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडला होता. मात्र त्यानंतर तो कधी घरी परतलाच नाही. तेजसच्या घरच्यांनी त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्याचा काहीही तपास लागत नव्हता. शेवटी त्याच्या घरच्यांनी अपहरणाच्या संशयाने बोरगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पण, पोलिसांनी या प्रकरणात फारसे लक्ष न दिल्याचे नातेवाईक सांगतात.

मृतदेह शेतातील विहिरीत –

अडीच महिने झाले तरी तेजसचा काही तपास लागत नव्हता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरोपींचा फोन आला आणि आरोपींनी २ लाख रूपये खंडणीची मागणी केली. त्यानंतर, खंडणीसाठी जो फोन आला होता तो नंबर अन्वेषण विभागाने ट्रॅप केला आणि त्याद्वारे आरोपींना अटक करण्यात आले. पण, तोपर्यंत तेजसचा आरोपींनी खून केला होता. आरोपींनी तेजसचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहिरीत टाकला होता. आशिष साळूंखे आणि साहिल चिखलगार असे आरोपींचे नाव आहे.

आरोपींवर संशय व्यक्त करुनही पोलिसांचं दुर्लक्ष –

यामध्ये दुर्देवाची बाब अशी की, अडीच महिन्यांपूर्वीच नातेवाईकांनी आरोपी आशिष साळूंखे आणि साहिल चिखलगार या दोघांवर संशय व्यक्त केला होता. पण, पोलिसांनी दूर्लक्ष केले तसेच दोन वेळा आरोपींना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. पण काही तपास लागला नव्हता.