नेपाळी नोकर दाम्पत्याने गुन्ह्यासाठी वापरले तब्बल ८९ सिमकार्ड

नोकर जोडीने गुन्ह्यामध्ये तब्बल ८९ सिम कार्ड वापरले असून त्यासाठी दिलेली सर्व कागदपत्र देखील बोगस असल्याचे समोर आले

Pune

घरमालकाच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून नोकर दाम्पत्याने घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली. ही घटना ११ जूनला महेशनगर, पिंपरीमध्ये घडली. या चोरीच्या घटनेमध्ये गीता आणि महेश अशी चोरी करणाऱ्या नेपाळी नोकर दाम्पत्यांची नावे समोर येत आहे. या घटनेच्या पोलीस तपासात या नोकर जोडीने गुन्ह्यामध्ये तब्बल ८९ सिम कार्ड वापरले असून त्यासाठी दिलेली सर्व कागदपत्र देखील बोगस असल्याचे समोर आले आहे. सिमकार्ड घेण्याकरिता आणि वेगवेगळ्या ठिकाणी गीता, लक्ष्मी हे नाव सर्वाधिक वापरली गेली आहेत. ते कपडे खरेदी करण्यासाठी गेले असता दोघे ही सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद

काशिनाथ महादू नेरकर-७७ , सुमन काशीनाथ नेरकर वय-६७ आणि दीपक काशिनाथ नेरकर वय-५० सर्व रा.महेशनगर, पिंपरी या तिघांना जेवणातून गुंगीचे औषध देण्यात आले होते. याप्रकरणी प्राची दीपक नेरकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अशी आहे घटना

नेरकर कुटुंब हे गेल्या अनेक वर्षांपासून महेश नगर येथे वास्तव्यास असून त्यांचा समीर नावाचा बांगला आहे. मुलगा समीर हा एअरफोर्समध्ये होता तो शाहिद झाला. त्यानंतर त्याच नाव बंगल्याला देण्यात आलं होतं. दीपक नेरकर हे ‘एअर फोर्स’मध्ये ग्रुप कॅप्टन आहेत. नुकतीच त्यांनी सुट्टी घेऊन पत्नी आणि मुलीसह पिंपरी मध्ये आले होते. खूप दिवसानंतर मुलगा येणार असल्याने वडील काशीनाथ नेरकर यांनी नेपाळी नोकर दाम्पत्य कामासाठी ठेवलं होतं. ११ जून रोजी दीपक यांची पत्नी या दोन्ही मुलींना घेण्यासाठी पुण्यात गेल्या होत्या. तेव्हा, घरात नेपाळी नोकर दाम्पत्य आणि वृद्ध आई वडील आणि मुलगा दीपक हेच होते. दुपारी जेवणाची वेळ झाली असता नोकर दाम्पत्याने तिघांच्या जेवणात गुंगीचे औषध टाकले. त्यानंतर तिघांना झोप लागली त्यामुळे त्यांना काही समजत नव्हतं, याचाच फायदा घेत नेपाळी नोकर दाम्पत्याने घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली.

सिमकार्ड घेण्यासाठी नोकर दाम्पत्याने बोगस कागदपत्र वापरली

दीपक यांची पत्नी आणि दोन्ही मुली दुपारी घरी आल्यानंतर दरवाजा दीपक यांनीच उघडला. परंतु, त्यांना काहीच समजत नव्हतं, ते पुन्हा घरात जाऊन झोपले. सायंकाळी चहा ची वेळ झाल्यानंतर नोकर दाम्पत्याला आवाज दिला असता ते नव्हते. घराचा पाठीमागील दरवाजा उघडा होता. घरातील कपाट उचकटलेले होते, हे सर्व पाहिल्यानंतर घरात काहीतरी घडलंय हे समोर आलं तसेच घरातील झोपलेले व्यक्ती आणखी देखील उठत नसल्याने संशय आला त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. तोपर्यंत नोकर दाम्पत्य निघून गेलेलं होते. दरम्यान, पोलिसांच्या तांत्रिक तपासात या नोकर दाम्पत्याने तब्बल ८९ सिमकार्ड गुन्ह्यात वापरले असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व सिमकार्ड घेण्यासाठी नोकर दाम्पत्याने बोगस कागदपत्र वापरली असून ते सध्या परराज्यात असल्याचे आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे. दोघे सराईत गुन्हेगार असल्याचा संशय पोलिसांना आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here