कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर, ‘ही’ ट्रेन आता खेडलाही थांबणार!

train booking

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, मंडणगड व दापोली विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ०६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस तिरुअनंतपुरम नेत्रावती कोविड विशेष एक्सप्रेस या गाडीचा खेड थांबा १० जून, २०२० ला आरक्षण प्रणालीमधून काढून टाकलेला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेली जिल्हा बंदी व नंतर पेडणे बोगद्यातील घटना यामुळे त्याकडे फारसे लक्ष देता आले नाही. परंतु १६ सप्टेंबर, २०२० पासून कोकण रेल्वे मार्ग संपूर्णपणे कार्यान्वित करण्यात येत आहे.

त्याचबरोबर केरळकडे जाणाऱ्या नेत्रावती कोविड विशेष एक्सप्रेसचा खेड थांबा देखील पूर्ववत करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रवासी आता मुंबई, ठाणे, पनवेल किंवा रोहा ते खेडपर्यंत आरक्षण करू शकतात. मुंबईकडे जाणाऱ्या ०६३४६ तिरुअनंतपुरम लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती कोविड विशेष एक्सप्रेस ह्या गाडीचा खेड थांबा रद्द झाला नव्हता, त्यामुळे त्याचे आरक्षण १२० दिवसांच्या कालावधीनुसार याआधीच सुरू आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ आरक्षित गाड्या सुरू असल्यामुळे खेडकरांनी आगाऊ आरक्षण करून वरील थांब्याचा लाभ घ्यावा.


हे ही वाचा – बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून गर्लफ्रेंडने गुप्तांगच कापलं!