घरदेश-विदेशगुड न्यूज : बरे होणार्‍या रुग्णांनी ओलांडला १४ लाखांचा टप्पा

गुड न्यूज : बरे होणार्‍या रुग्णांनी ओलांडला १४ लाखांचा टप्पा

Subscribe

भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच थोडा दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रिकव्हरी रेटही वाढल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिली आहे.

शनिवारपर्यंत देशात 14.2 लाख जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट हा 68.32 वर गेला आहे. तर देशातल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही कमी करण्यात यश मिळालं असून त्याची टक्केवारी 2.04 एवढी झाली आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत तब्बल 61 हजार 537 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.त्यामुळे देशातील आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 20 लाख 88 हजार 612 वर पोहोचला आहे.मृतांचा आकडा 42 हजार 518 वर पोहोचला आहे. 6 लाख 19 हजार 088 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे.

मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 24 तासांत 48900 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. 15 जूनपर्यंत 51. 08 रिकव्हरी रेट होता तो वाढून 68.32 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -