ऑनलाईन लॉटरी बंद होणार

शासकीय व्यवहारांना आता पॅन अनिवार्य

Mumbai

राज्यात गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन लॉटरीचे पीक वाढत चालले आहे. या ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल चोरी केला जात असल्याची तक्रार समोर येत होती. याची गंभीर दखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली असून राज्यात ऑनलाईन लॉटरीवर बंदी घालण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला आहे. ऑनलाईन लॉटरी बंद करताना यापुढे केवळ पेपर लॉटरी सुरू राहणार आहे. त्याशिवाय राज्य सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांसाठी यापुढे पॅन क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या महसूल विभागाची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी मंत्रालयात पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरील निर्णय घेण्याची सूचना केली आहे. तर महसूलचोरीला आळा घालण्यासाठी इतरही अनेक उपाययोजना अजित पवार यांनी सुचविल्या आहेत.

राज्यातील विकासयोजना आणि पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यावर अर्थमंत्री या नात्याने अजित पवार यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. ते विविध विभागांचा महसूलवाढीच्या अनुषंगाने आढावा घेत आहेत. त्यासाठी मंगळवारची बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यात प्रामुख्याने महसूलवाढ करताना प्रामुख्याने महसूलचोरीला आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. ऑनलाईन लॉटरीद्वारे होणारी महसूलचोरी मोठी असून येणार्‍या काळात राज्यात केवळ पेपर लॉटरी सुरू कायम ठेवण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्याला काही काळ आर्थिक फटका बसेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here