घरमहाराष्ट्रनाशिकवादळ शमले इशारा कायम तापमान वाढल्याने नाशिककर घामाघूम

वादळ शमले इशारा कायम तापमान वाढल्याने नाशिककर घामाघूम

Subscribe

जिल्हयात काही भागात तो तुरळक स्वरूपात बरसेल, अशी शक्यता वर्तवली जात असताना दरम्यान नाशिककर उकाडयाने हैराण झाले.

राज्यात घोंगावणारे महा चक्रीवादळ किनारपट्टीवर येईपर्यंत शमले आहे. त्यामुळे काही अंशी धोका टळला असला तरी, पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा मात्र कायम आहे. जिल्हयात काही भागात तो तुरळक स्वरूपात बरसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान नाशिककर उकाडयाने हैराण झाले. असून बुधवारी कमाल तापमान ३ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. जिल्हयात यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यातच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सुरू असलेल्या अवकाळीने आता पुरे झाले अशी म्हणण्याची वेळ आली आहे. ‘क्यार’, ‘महा’ या चक्रीवादळांमुळे पाऊस पडत असल्याचे स्कायमेटने सांगितले.

उत्तर महाराष्ट्रावर घोंगावणाऱे वादळ शमणार

या चक्रीवादळामुळे मध्य, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यानूसार प्रशासनानेही तातडीने यंत्रणेला सुचना देत अर्लट राहण्याच्या सुचना दिल्या. ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान या चक्रीवादळामुळे जिल्हयात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असला तरी गुजरात किनारपटटीवर धडके पर्यंतया वादळाची तीव्रता कमी झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तुर्तास तरी या वादळाचा धोका टळला असला तरी, गुजरात किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस कोसळू शकतो, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यात, नाशिक पासूनजवळच असलेल्या संगमनेर पासून पुणे सांगली सातारा पर्यंत पावसाची शक्यता आहे. त्यामुळेमध्य, उत्तर महाराष्ट्रावर घोंगावणाऱे चक्रीवादळ शमणार असले तरी, पावसाचा जोर मात्र मोठा असेल. मात्र सध्या शहरातील तापमानात वाढ झाल्याचे दिसून येते. बुधवारी ३२ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले.

- Advertisement -

पाऊस नसल्याने पंचनामे कामात गती

पंचनामे कामात गती ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने मुदतीत पंचनामे पूर्ण कसे करावे, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. दरम्यान बुधवारी पावसाने उघडिप दिल्याने पंचनामे कामात गती घेण्यात आली असून आज अखेर २ लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे. पंचनामेवेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकार्‍यांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -