घरमहाराष्ट्रपुण्याच्या व्यापार्‍याकडे खंडणीची मागणी करुन लुटमार

पुण्याच्या व्यापार्‍याकडे खंडणीची मागणी करुन लुटमार

Subscribe

गोवंडीतून आरोपीस अटक; पुणे पोलीस ताबा घेणार

पुण्यातील एका 79 वर्षांच्या वयोवृद्ध कॉटन व्यापार्‍याच्या बंगल्यात घुसून घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्यांना कोंडून ठेवून एक कोटी रुपयांची खंडणीची मागणी करुन लुटमार करुन पळून गेलेल्या एका मुख्य आरोपीला गोवंडी परिसरातून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अब्दुल शेख असे या आरोपीचे नाव असून त्याला पुढील चौकशीसाठी पुण्याच्या डेक्कन पोलिसांकडे सोपविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बोगस जामिनदार राहून स्थानिक न्यायालयाची फसवणूक करणार्‍या टोळ्यांविरुद्ध गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम सुरु केली होती. ही मोहीम सुरु असतानाच अशा दोन टोळ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या गुन्ह्यांतील पाहिजे आरोपींचा शोध सुरु असतानाच शुक्रवारी गोवंडीतून अब्दुल शेख याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या चौकशीत त्याने पुण्यात एका कॉटन व्यापार्‍याच्या घरात घुसून रॉबरीचा प्रयत्न करुन त्यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याचे उघडकीस आले होते.

- Advertisement -

रूममध्ये कोंडून ठेवले
हर्षकुमार खिमजी यांचा पुण्यात एक तसेच तसेच कालिना परिसरात एक खाजगी कार्यालय आहे. 16 जानेवारी ते त्यांचे मित्र हेमाजी छेडा, नोकर आणि केअरटेकर यांच्यासोबत त्यांच्या पुण्यातील बंगल्यात होते. यावेळी त्यांच्या बंगल्यात चारजण घुसले आणि त्यांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्यांना एका रुममध्ये कोंडून ठेवले. त्यांच्याकडे पैशांची मागणी केली, मात्र त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे अब्दुल शेख हा त्यांच्या नोकराला घेऊन मुंबईतील कार्यालयात एक कोटी रुपये घेण्यासाठी निघून गेला.

नोकरासोडून पळला
याच दरम्यान कोंडून ठेवलेल्या हर्षकुमार आणि हेमाजी यांनी आरडाओरड करुन स्थानिक लोकांची मदत मागण्याचा प्रयत्न केला, आपला लुटमारीचा प्रयत्न फसला गेल्यानंतर ते तिघेही कॅश, सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल असा पावणेसहा लाख रुपयांचा ऐवज घेऊन पळून गेले होते. त्याचा चवथा साथीदार अब्दुल हा नोकराला घेऊन कुर्लापर्यंत आला होत. त्यालाही त्यांनी पळून जाण्यास सांगितले होते. त्यानंतर तो नोकराला सोडून पळून गेला होता. तेव्हापासून तो गोवंडी परिसरात राहत होता. अखेर त्याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी या चारही आरोपींविरुद्ध पोलिसांनी अपहरण, अपहरण, घरात घुसून जिवे मारण्याची धमकी देणे आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -