घरमहाराष्ट्रनाशिकरेल्वेत चुकलेल्या हतबल बाबांची कहाणी... अन् आरपीएफ टॉप कामगिरी

रेल्वेत चुकलेल्या हतबल बाबांची कहाणी… अन् आरपीएफ टॉप कामगिरी

Subscribe

मनमाड स्थानकाच्या आरपीएफ चमूने वेळेवर कारवाई करुन मानसिकरीत्या विचलित झालेल्या व्यक्तीस त्याच्या कुटूंबियांसह एकत्र केले.

लॉकडाऊनच्या संकटकाळात श्रमिक ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या आईला आपल्या लहान मुलीला दूध मिळावं यासाठी रेल्वे जावणाकडे विनंती केली होती. त्यानंतर आपल्या जीवाची पर्वा न करता, धावत्या ट्रेनच्या मागे धावणाऱ्या आरपीएफ जवानांनी माणुसकीचं दर्शन घडवले होते. ही घटना ताजी असतानाच मध्य रेल्वेच्या आरपीएफ टीमने सुद्धा मानसिकदृष्ट्या विचलित झालेल्या बाबांना त्याच्या कुटूंबियांपर्यंत सुखरूप  पोहचवले आहे.

काय आहे घटना

मनमाड स्थानकाच्या आरपीएफ चमूने वेळेवर कारवाई करुन मानसिकरीत्या विचलित झालेल्या व्यक्तीस त्याच्या कुटूंबियांसह एकत्र केले.  १ जुलै २०२० रोजी मध्यरात्री १० वाजताच्या सुमारास आरपीएफ पोस्ट, मनमाड येथील पोलीस निरीक्षक यांना  मदतीसाठी एका व्यक्तीचा फोन आला. ते म्हणाले की, त्यांचे वडिल बोकुल चंद्र दास (६० वर्षे) हे  ट्रेन क्रमांक ०२८०९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -हावडा विशेष गाडीतील बी-१ कोचमधील बर्थ क्रमांक ६० वरून प्रवास करीत आहेत आणि त्याचे सामान चोरीला गेले आहे.  पुढे त्यांनी माहिती दिली की, त्यांचे वडील मानसिकदृष्ट्या विचलित आहेत, त्यांना मदतीची आवश्यकता आहे आणि ट्रेनने  नुकतेच नाशिक सोडले आहे. मनमाडची आरपीएफ टीम तातडीने कारवाईसाठी सज्ज झाली. मध्यरात्री ०१ वाजता ट्रेन मनमाडला पोहोचताच उपनिरीक्षक ए.के. सिंग यांनी त्यांच्या टीमसह कोच मध्ये गेले, परंतु प्रवासी बोकुल चंद्र हे कोच मध्ये नव्हते.  कोच मधील तिकीट तपासणीस  इब्राहिम यांनी माहिती दिली की, इगतपुरी पर्यंत बर्थ क्रमांक 60 वर कोणताही प्रवासी दाखल झाला नाही आणि म्हणूनच नाशिक रोड येथील आरएसी प्रवाशाला बर्थ देण्यात आला.

आरपीएफ पोलिसांचे कौतुक

सब-इन्स्पेक्टर यांनी प्रवासी बोकुलचंद्र दास यांच्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला जो त्यांच्या मुलाने दिला होता, पण फोनवर असलेली व्यक्ती उत्तर देऊ शकली नाही.  त्यांनी त्या व्यक्तीला सोबत असलेल्या प्रवाशाला फोन देण्यास सांगितले. त्या प्रवाशाने सांगितले की ते ट्रेन क्रमांक ०१०१५ गोरखपूर विशेष गाडीतील कोच क्रमांक एस -१२ मध्ये प्रवास करत आहेत.  पहाटे ०३.२५ वाजता मनमाड येथे पोचल्यावर त्यांना ती व्यक्ती सापडली.  हे सर्व  बोकुलचंद्र दास यांचा मुलगा उज्ज्वल दास यांना कळविण्यात आले.त्याने वडिलांना तिथेच ताब्यात घेण्याची विनंती केली आणि वडिलांना घेण्यासाठी तो वैयक्तिकरित्या येईल असे कळविले. उज्ज्वल चंद्र दास हे त्यांचे चुलत भाऊ राजू यांच्यासमवेत २ जुलै  २०२० रोजी ८ वाजताच्या सुमारास  मनमाड येथे आले. मनमाडच्या आरपीएफ चमूने बोकुल चंद्र दास यांना त्यांचा मुलगा उज्ज्वल चंद्र दास यांच्या ताब्यात देऊन सुखरूप एकत्र केले. वेळीच आणि तातडीने कारवाई केल्याबद्दल या परिवाराने आरपीएफ टीमचे कौतुक केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -