घरCORONA UPDATEसरकारच्या निर्णयाविरोधात आयएमएचे ४५ हजार डॉक्टर संघर्षाच्या पावित्र्यात 

सरकारच्या निर्णयाविरोधात आयएमएचे ४५ हजार डॉक्टर संघर्षाच्या पावित्र्यात 

Subscribe

आयएमएने १ सप्टेंबरला दरांबाबत झालेल्या बैठकीचे स्मरण देऊन तीन दिवसात फेरचर्चा करण्याची विनंती केली, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने सरकारच्या निर्णयाविरुध्द आयएमएच्या महाराष्ट्रातील २१६ शाखांमधील ४५ हजार डॉक्टरांकडून संघर्षाचा पवित्रा घेत विविध मार्गाने लढा दिला जाणार आहे.

कोरोनाची सुरुवात झाल्यापासून महाराष्ट्र सरकारने आयएमएच्या आणि इतर खाजगी डॉक्टरांवर सतत अन्याय केला आहे. डॉक्टरांना विश्वासात न घेता कोव्हिड हॉस्पिटल्सच्या उपचारांचे दर दडपशाही पद्धतीने ठरवले. त्यामुळे हॉस्पिटल्स बंद पडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आयएमएने १ सप्टेंबरला दरांबाबत झालेल्या बैठकीचे स्मरण देऊन तीन दिवसात फेरचर्चा करण्याची विनंती केली, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने सरकारच्या निर्णयाविरुध्द आयएमएच्या महाराष्ट्रातील २१६ शाखांमधील ४५ हजार डॉक्टरांकडून संघर्षाचा पवित्रा घेत विविध मार्गाने लढा दिला जाणार आहे.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आयएमएचे सर्व सदस्य बांधिल आहेत. कोरोनाच्या लढ्यात महाराष्ट्रातील सुमारे दीडशेहून अधिक खाजगी डॉक्टरांनी आपले प्राणही गमावले आहेत. साथीच्या नियंत्रणासाठी डॉक्टरांचा सल्ला न घेता प्रशासकांकडे जबाबदारी सोपवल्याने अनेक ठिकाणी अपयश येत आहे. आता हे अपयश लपवण्यासाठी खासगी डॉक्टरांवर चिखलफेक करण्यात येत आहे. आयसीयूसाठी ठरवलेल्या दरामध्ये ऑक्सिजन, पीपीई किट्स, बायोमेडिकल वेस्ट चार्जेस, कर्मचार्‍यांचे पगार, निर्जंतुकीकरणाचा खर्च भागवणे हॉस्पिटल्सना अवघड होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील २५ हजार हॉस्पिटल्सपैकी बहुसंख्य हॉस्पिटल्स बंद पडण्याची वेळ आली आहे. आरोग्यमंत्र्यांनी ३१ ऑगस्टपूर्वी एक बैठक घेऊन दर निश्चित करण्याचे ठरले होते. मात्र आरोग्य सचिवांनी ३१ ऑगस्टला परिपत्रक काढून दर कायम ठेवले. हे परिपत्रक अमान्य करत ते फेटाळण्याचा निर्णय आयएमएने घेतला आहे. त्यानुसार सरकारच्या निर्णयाविरोधात तीव्र संघर्ष करण्याचा निर्णय आयएमएने घेतला आहे.

- Advertisement -

कोव्हिड रुग्णाचा उपचार करताना हुतात्मे झालेल्या डॉक्टरांच्या स्मरणार्थ ९ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता डॉक्टर्स हॉस्पिटल्ससमोर एकत्रित होऊन १० मिनिटे मूक श्रद्धांजली वाहतील. तर रात्री ८ वाजता दीप श्रद्धांजली वाहण्यात येईल. १० सप्टेंबरला प्रशासकीय अधिकार्‍यांच्या कार्यालयासमोर शांततामय निदर्शने करण्याबरोबरच आझाद मैदान येथे शांततेत डॉक्टरांची महारॅली काढण्यात येईल. आयएमएच्या सर्व शाखा १० सप्टेंबरला सकाळी ११ वाजता एकत्र जमून मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशनच्या प्रतिकृतींची होळी करतील, असे आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

डॉक्टर होणार सेल्फ क्वारंटाईन

कोरोनाचा सामना करताना १५० हून अधिक डॉक्टर्स मृत्यूमुखी पडले तरीही अथक परिश्रम करून डॉक्टर्स स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा देत आहेत. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आणि शासकीय अधिकार्‍यांनी ज्याप्रमाणे स्वतःला ‘सेल्फ क्वारंटाइन’ करून घेतले. त्याप्रमाणे डॉक्टरांनासुध्दा आता सामुदायिकरित्या ‘सेल्फ क्वारंटाइन’ करून घेण्याची वेळ आली आहे. या विलगीकरणाची मुदत १४ दिवसांपर्यंत असू शकेल, असेही आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -