घरमहाराष्ट्रसोलापूर: उड्डाण पुलावरून भरधाव ट्रक रेल्वे रुळावर कोसळला

सोलापूर: उड्डाण पुलावरून भरधाव ट्रक रेल्वे रुळावर कोसळला

Subscribe

ट्रकमध्ये नेमके कशाचे बॅरल आहेत हे अद्याप अस्पष्ट

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग असणाऱ्या मार्गावर मोहोळ जवळ असलेल्या उड्डाण पुलावरून एक जोरदार वेगात असणारा ट्रक थेट रेल्वे रूळावर कोसळल्याची घटना घडली आहे. हा ट्रक रेल्वे रूळावर कोसळल्याने ट्रकमध्ये असणारे बॅरेल रुळावर पडले आहे. ट्रकमध्ये नेमके कशाचे बॅरल आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ही घटना सकाळी ९ च्या सुमारास घडली. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही घटना घडली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघाताची घटना घडल्याने सोलापूर विभागातील गाड्या धीम्या गतीने सुरू आहेत. या अपघातामध्ये किती जीवीतहानी झाली आहे, याची आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.


हेही वाचा- काश्मीर मुद्द्यावर शाहीद वि. गंभीर ऑनलाईन सामना!

यावेळी, एआरटी म्हणजेच अपघात निवारण व्हॅन घटनास्थळी पाठवण्यात आला आहे. सोलापूरकडून दौंडच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे रुळावर हा ट्रक कोसळला आहे. तर दुसर्या मार्गावरील वाहतुक सुरळीत सुरू आहे, अशी माहिती सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -