घरमहाराष्ट्रनाशिकतीन पायाचे सरकार अयशस्वी ठरले; माजी आमदार वैभव पिचड यांची टीका

तीन पायाचे सरकार अयशस्वी ठरले; माजी आमदार वैभव पिचड यांची टीका

Subscribe

तीन पायांच्या राज्य सरकारने कोरोना महामारीच्या संकटात योग्य नियोजन न केल्याने सरकार सर्वच पातळीवर अयशस्वी ठरले आहे. आदिवासी खावटी वाटपात दुजाभाव केल्याने ग्रामीण आदिवासी, शेतकरी, शेतमजूर जनता उपासमारीसारख्या संकटाला सामोरी जात आहे. राज्यपालांनी या सरकारला समज द्यावी. सरकारचा आम्ही भाजपच्या वतीने काळे मास्क व काळे झेंडे दाखवून निषेध करत असल्याचे माजी आमदार व भाजपचे नेते वैभव पिचड यांनी सांगितले.

शुक्रवारी अकोले तालुक्यात ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवत भाजप कार्यकर्त्यांनी सुरक्षित अंतराचा नियम पाळत राज्य सरकारचा निषेध केला. अध्यक्ष सीताराम भांगरे, जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, गिरजाजी जाधव, उपसभापती दत्तात्रय देशमुख, यशवंत आभाळे, भाऊसाहेब वाकचौरे, सरपंच गणपत देशमुख, गोकुळ कानकाटे, भास्कर एलमामे, संतोष बनसोडे, अभि नवळी, संजय अवसरकर, दत्तात्रय निगळे, संजय सूर्यवंशी, संतोष बनसोडे यांच्यासह पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाबद्दल घोषणा देऊन उपस्थितांनी निषेध व्यक्त करून सरकारने जनतेचा भ्रमनिराशा केल्याचे सांगितले.

माजी आमदार वैभव पिचड म्हणाले, केंद्र सरकारने राज्य सरकारला मदत करूनही सरकार मदतीची अपेक्षा करीत आहे. राज्य सरकारने केवळ घोषणा केल्यात त्याची कोणतीही अमलबजावणी केली नाही. राज्यातील १ कोटी ४० लाख आदिवासी असताना केवळ १५ ते २० लाख आदिवासींना खावटी धान्य देण्याचे मान्य केले. दुजाभाव केला, उर्वरित आदिवासींनी काय करायचे. आजही आदिवासी माणूस उपासमारीमुळे जंगलातील कंदमुळे खाऊन दिवस कंठीत असल्याचे चित्र आहे. सरकार अजूनही जागे झाले नाही. आदिवासीचे उत्पन्नाचे साधने थांबली आहेत. शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतीमालाला भाव नाही, विकास कामे थांबली आहेत, रोजगार नसल्याने शेतमजूर कष्टकरी उपाशीपोटी राहत असून सरकारने यावर कोणताही ठोस कार्यक्रम राबविला नसल्याने आज कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

- Advertisement -

पुण्याकडून लोक गावाकडे येत अाहेत. गावागावात भितीचे वातावरण आहे. सरपंचावर हल्ले केले जात आहे. त्यांना संरक्षण मिळत नाही. स्थानिक आमदार समाज माध्यमांवर फोटो टाकण्यात गुंतले आहेत. सरकार तुमचे आहे माजी मंत्री पिचड यांनी आदिवासी विकास विभागाचे बजेट स्वतंत्र केले. आदिवासी माणूस सरकारकडे अपेक्षेने पाहत आहे. मात्र स्थानिक आमदार व राज्य सरकार या बाबीकडे गांभीर्याने पाहत नसेल तर कोरोनाबाबत लोक रस्त्यावर उतरतील. शेतकरी, शेतमजूर तुम्हाला माफ करणार नाही असेही पिचड यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -