घरमहाराष्ट्रमहिलेने दिला ५.०५ किलो वजनाच्या मुलीला जन्म

महिलेने दिला ५.०५ किलो वजनाच्या मुलीला जन्म

Subscribe

गरिमा श्रीवास्तव यांनी खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलमध्ये ५.०५ किलो वजनाच्या मुलीला जन्म दिला. सामान्यपणे आढळणाऱ्या वजनापेक्षा अधिक वजनाच्या बाळाचा जन्म होणे हे भारतात दुर्मीळ आहे.

पुण्यातील ३० वर्षांच्या गरिमा श्रीवास्तव यांनी खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलमध्ये ५.०५ किलो वजनाच्या मुलीला जन्म दिला. जन्मतःच सामान्य वजनापेक्षा अधिक वजन असलेल्या बाळाची प्रसूती सिझेरिअन शस्त्रक्रियेने झाली. सामान्यपणे आढळणाऱ्या वजनापेक्षा अधिक वजनाच्या बाळाचा जन्म होणे हे भारतात दुर्मीळ आहे. सामान्य वजनाहून अधिक वजनाच्या सदृढ मुलीला जन्म दिल्यामुळे गरिमाही आनंदीत आहेत.

प्रसूतीपूर्वी गरिमाचे वजन १०५ किलो होते

गरिमा श्रीवास्तव आपल्या गर्भावस्थेत नियमितपणे वैद्यकीय तपासणी करून घेत असत. त्यांनी गरोदरपणाचे नऊ महिने पूर्ण केले. प्रसूतीकळांमुळे मदरहूड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची रक्तशर्करा आणि इतर पूर्वचाचण्यांचे निष्कर्ष सामान्य होते. प्रसूतीपूर्वी त्यांचे वजन १०५ किलो होते. ही एक काळजीची बाब होती आणि पुढील व्यवस्थापनाच्या दृष्टीने एक आव्हान होते. त्यांच्या तिसऱ्या तिमाहीच्या स्कॅनमध्ये त्यांना पॉलिहायड्राम्निऑस असल्याचे दिसून आले. या परिस्थितीत गर्भाशयातील बाळाभोवती अॅम्निऑटिक द्रव जास्त असते आणि बाळाचे वजन ३ किलो असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. गर्भाशयातील बाळाला आधार देणे आणि बाळाचे हात-पाय, फुफ्फुसे आणि पचनक्रिया करणाऱ्या अवयवांचा विकास करणे हे या द्रवाचे उद्दिष्ट असते. या द्रवामुळे बाळाला उशी मिळते आणि सम, सुयोग्य शारीरिक तापमान राखण्यास मदत होते. अशा मोठ्या बाळांना मॅक्रोसॉमिक बाळे म्हणतात.

- Advertisement -

“सी-सेक्शन प्रसूती शस्त्रक्रिया करताना बाळाचे डोके बाहेरील बाजूस वाकलेले होते आणि गर्भाशयातील पोकळीमध्ये तरंगत होते. त्यामुळे ऑपरेशन थिएटरमधील प्रत्येकालाच आश्चर्य वाटले होते. परिणामी बाळ बाहेर काढणे काहीसे कठीण होते. ही गुंतागुंतीची परिस्थिती होती. पण आता आई आणि बाळाची प्रकृती शस्त्रक्रियेनंतर समान्य आहे. मधुमेह नसलेल्या महिलेला प्रमाणापेक्षा अधिक वजन असलेले बाळ होणे, ही खूपच दुर्मीळ केस आहे.”- डॉ. मोहिता गोयल, मदरहूड हॉस्पिटलमधील सल्लागार प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ 

“माझ्या बाळाला कुशीत घेऊन मला अत्यंत आनंद झाला. मदरहूड हॉस्पिटलमधील डॉ. मोहिता गोयल आणि त्यांच्या टीमची अत्यंत आभारी आहे. त्यांच्यामुळेच, कोणतीही गुंतागुंत न होता बाळ बाहेर येऊ शकले.”- गरिमा श्रीवास्तव, नवजात कन्येच्या माता 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -