घरमहाराष्ट्रकोल्हापूरात महिलेने दोन मुलांसह पेटवून घेतले

कोल्हापूरात महिलेने दोन मुलांसह पेटवून घेतले

Subscribe

स्वाती पाटीलने तिच्या दोन मुलांसह पेटवून घेत आत्महत्या केली आहे. विभावरी आणि शिवांश अशी या दोन चिमुकल्यांची नावं आहेत.

कोल्हापूरच्या शाहुवाडीमध्ये विवाहितेने दोन मुलांसह आत्महत्या केली आहे. शाहुवाडी तालुक्यातील नेर्ले गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. स्वाती पाटील असं या विवाहित महिलेचे नाव आहे. स्वातीने तिच्या दोन मुलांसह पेटवून घेत आत्महत्या केली आहे. विभावरी आणि शिवांश अशी या दोन चिमुकल्यांची नावं आहेत. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. शाहुवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून घटनेचा तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे नेर्ले गावात खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -