नाशिक : हिंगणघाटची पुनरावृत्ती; रॉकेल टाकून महिलेला जाळले

नाशिकच्या लासलगावमध्ये बस स्थानकावर महिलेला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

Nashik
The woman was burnt after throwing the kerosene in nashik
हिंगणघाटची पुनरावृत्ती; रॉकेल टाकून महिलेला जाळले

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याच्या दारोडा गावातील एका शिक्षेकेवर विकी नगराळे या माथेफिरू तरुणाने पेट्रोल टाकून तिला जाळले असल्याची घटना ताजी असताना आज, शनिवारी पुन्हा एकदा या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार,  नाशिकच्या लासलगावमध्ये बस स्थानकावर महिलेला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चार ते पाच मुलांनी मिळून पीडित महिलेवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला असून प्राथमिक माहितीनुसार, ही महिला ४० टक्के भाजली आहे. तसेच लासलगाव येथील पिंपळगाव नजीकच्या गावातील ही महिला असल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ बसस्थानकावर धाव घेत सीसीटीव्हीच्या फूटेजच्या आधारे तपासाला गती दिली आहे.  याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आले आहे.

नाशिक : लासलगाव जळीतकांड; बस स्थानकावरील धावाधाव

नाशिक : लासलगाव जळीतकांड; बस स्थानकावरील धावाधाव

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 15, 2020

नेमके काय घडले?

निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकावर पीडित महिला रसवंतीगृहाजवळ बसची वाट पाहत होती. त्यावेळी अचानक चार अज्ञात तरूणांनी महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवले. या दुर्देवी घटनेमध्ये महिला गंभीर भाजली आहे. सध्या तिला नाशिक जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यापूर्वी अशी दुर्देवी घटना घडल्यामुळे पोलिसांनी याकडे गांभिर्यानं घेतले आहे.

पीडित महिलेची प्रकृत्ती गंभीर असून ही महिला ६७ टक्के भाजली आहे. मात्र, सध्या या महिलेवर उपचार सुरु असून वेळ पडल्यास सकाळी मुंबईतून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम बोलावण्याबाबत निर्णय घेऊ, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली आहे.


हेही वाचा – मुंबई महानगरपालिकेत ८१० लिपिकांच्या भरतीचा प्रस्ताव मंजूर