माजी पोलीस महासंचालकांच्याच घरी चोरी!

राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

Nagpur
Theft at former Director General of Police house Nagpur
माजी पोलीस महासंचालकांच्याच घरी चोरी! (प्रातिनिधिक फोटो)

पोलीस जनतेचे रक्षण करतात. पोलीस चोरी करणाऱ्या चोरांना धडा शिकवतात, असा समज सर्वसामान्य जनतेचा आहे. परंतु, सर्वसामान्य जनतेला धक्का देणारी घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूरमध्ये माजी पोलीस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या घरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे सर्व स्तरावरुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांच्याच घरात जर चोऱ्या होत असतील, तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केला जात आहे. शिवाय, माजी पोलीस महासंचालकांच्याच घरी चोरी झाल्यामुळे नागपूर पोलीस दलाचे धाबे दणाणले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. उच्चभ्रू आणि गरीब वस्त्यांमध्येही दररोज चोरीच्या घटना घडत आहेत.

हेही वाचा – बॉलीवूड फॅशन डिझायनरच्या घरी चोरी करणार्‍या नोकराला अटक

सोने आणि चांदीचा मौल्यवान ऐवज चोरी

प्रबीरकुमार चक्रवर्ती यांचे नागपूरच्या धरमपेठ भागातील झेंडा चौक परिसरात चार मजली इमारतीचे घर आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर देवघर आहे. १३ जानेवारीला सकाळी या देवघरात नियमितपणे पूजेसाठी येणाऱ्या पुजाऱ्याला देवघरातील काही सोने आणि चांदिचा ऐवज गायब झाल्याचे जाणवले. पुजारीने घरातील सदस्यांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर घरातील सदस्यांनी घरातच वस्तू शोधल्या. मात्र, घरात या वस्तू न मिळाल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चोराचा शोध सुरु केला आहे. परंतु, अद्यापही चोराचा तपास लागू शकलेला नाही.

हेही वाचा – माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या घरामध्ये चोरी

घरातील नोकर घटनेनंतर बेपत्ता

नागपूर पोलिसांना याप्रकरणी घरातील एका नोकरावर संशय आहे. हा नोकर चोरीची घटना झाल्यापासून बेपत्ता झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला आहे. सध्या पोलीस या नोकराचा शोध घेत आहेत.

हेही वाचा – पोलिसाच्या मुलास घरफोडी प्रकरणी अटक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here