घरमहाराष्ट्रपुण्यातील नाकोडा ज्वेलर्सवर दरोडा; २ लाख रुपये, ४० किलोचे दागिने चोरीला

पुण्यातील नाकोडा ज्वेलर्सवर दरोडा; २ लाख रुपये, ४० किलोचे दागिने चोरीला

Subscribe

पुण्यातील औंध परिसरात परिहार चौकात कुमार क्लासिक सोसायटीमधील नाकोडा ज्वेलर्सवर आज, गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास चोरट्यांनी दरोडा टाकला. या घटनेत दोन लाख रुपयांसह साधारण ४० किलो चांदी व सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे स्थानिक परिसरात सोने व्यापारांमध्ये खळबळ उडाली आहे. कटावणीच्या मदतीने दुकानाचे मुख्य शटर तोडून आतमध्ये प्रवेश करत त्यानंतर मेन लॉक तोडून ही चोरी केल्याचे समजते. हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यामध्ये तोंडाला रुमाल बांधलेले चार चोरटे दिसत आहेत.

भल्या पहाटे नाकोडा ज्वेलर्सवर दरोडा

भल्या पहाटे नाकोडा ज्वेलर्सवर दरोडा

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 17, 2019

- Advertisement -

काय आहे घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन ते चार चोरट्यांनी दुकानाचे शटर उघडून दुकानात प्रवेश केला. यानंतर दुकानात असलेले सोन्यांचे दागिने व इतर मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. चतुःशृंगी पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दुकानाचे मालक भवानी पेठमध्ये राहण्यास आहेत. पहाटे पाचच्या सुमारास दूध टाकण्यासाठी एक व्यक्ती सोसायटीत आली होती. त्यावेळी त्याच्या निदर्शनास हा सर्व प्रकार आला. त्यानंतर त्याने त्याची माहिती फोनद्वारे मालकाला दिली. चोरी झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. याचबरोबर चौघांच्या टोळक्याने इतर परिसरातील बंद सदनिका फोडण्याचा प्रयत्नदेखील केला मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. ज्या ठिकाणी चोरी झाली त्या ठिकाणापासून काही अंतरावर औंध पोलीस चौकी आहे.

हेही वाचा –

सावरकरांना भारतरत्न! कन्हैया कुमारचे भगतसिंगबाबत मोठे वक्तव्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -