…तर ‘पानिपत’ प्रदर्शित होऊ देणार नाही; छावा क्रांतिवीर संघटनेचा इशारा

अलिकडेच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. पण प्रदर्शनापूर्वीच ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाला विरोध होत आहे.

Nashik
panipat

१४ जानेवारी १७६१ या दिवशी लढल्या गेलेल्या पानिपतचा इतिहास सर्वांना माहितच आहे. हेच पानिपतचे महायुद्ध लवकरच रुपेरी पडद्यावर येत आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता आशुतोष गोवारीकर ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटातून पानिपतचा इतिहास प्रेक्षकांसमोर सादर करत आहेत. अलिकडेच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. पण प्रदर्शनापूर्वीच ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाला विरोध होत आहे. पानिपत चित्रपटात मराठ्यांच्या पराक्रमाचा अनादर झाल्यास हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराच छावा क्रांतिवीर संघटनेने दिला आहे. त्याबाबतचे निवेदन सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

then we will oppose release of 'Panipat'

…म्हणून विरोध होण्याची शक्यता

‘पानिपत’या चित्रपटात मराठ्यांच्या पराक्रमाचा अनादर झाल्यास हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा छावा क्रांतिवीर संघटनेनी दिला आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच ‘पानिपत’ला विरोध होऊ लागला आहे. दरम्यान, येत्या ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. पानिपत चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ऐतिहासिक चित्रपटाविषयी महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता लागून आहे. पानिपतची लढाई होण्याचे मुख्य कारण म्हणजे दत्ताजी शिंदे होय. मात्र, ट्रेलरमध्ये पेशवे आणि अब्दाली यांच्या व्यतिरिक्त कोणत्याच मराठा सरदाराचे नाव देखील नाही. यामुळे मराठ्यांच्या मनात असंतोषाची लाट निर्माण झाली. दत्ताजी शिंदे, श्रीमंत महादजी शिंदे सरकार, श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्याशिवाय पानिपत बनतोच कसा? असा प्रश्न मराठी जनतेला पडल्याचे छावा संघटनेनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

६ डिसेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार

सत्य घटनेवर आधारित ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. सगळेच पराभव विसरण्यासारखे नसतात. मराठा साम्राज्य अबादीत ठेवण्यासाठी करण्यात आलेले महायुद्ध पानिपतच्या रणभूमीत पार पडले. त्या ऐतिहासिक घटनेला रुपेरी पडद्यावर साकारणारे दिग्दर्शक-निर्माता आशुतोष गोवारीकर यांचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर आणि अभिनेत्री क्रीती सिनॉन यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. कालच त्याचे व्यक्तिरेखेतील पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले होते. तर आज चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. येत्या ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.