…आणि संतापलेल्या चोरट्यांनी पानाची टपरीच पेटवली

नाशिक-पुणे मार्गावर संगमनेरनजीक माहुली फाटा येथे अमित विठ्ठल गाडेकर यांची पानटपरी आहे. चोरट्यांनी ही टपरी तिसऱ्यांदा फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ती फोडता आली नाही. म्हणून चक्क टपरीच पेटवून दिली.

Nashik
burn fire at paan shop
पानाची टपरी पेटवली

पुणे मार्गावरील एक पानटपरी सलग दोनदा फोडून महागडा माल चोरी गेला. त्यामुळे टपरी मालकाने चोरट्यांनी जेथून टपरी फोडली तेथे मजबूत पत्रा लावला. त्यामुळे तिसऱ्यांदा चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना टपरी फोडण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. चोरटे चोरीसाठी टपरीत घुसले, मात्र टपरीत काहीच नसल्याने त्यांचा हिरमोड झाला. संतापलेल्या या चोरट्यांनी मग टपरीच पेटवून देण्याचा प्रकार संगमनेरनजीक घडला.

नाशिक-पुणे मार्गावर संगमनेरनजीक माहुली फाटा येथे अमित विठ्ठल गाडेकर यांची पानटपरी आहे. तिच्या शेजारीच हॉटेल असल्याने या मार्गावरुन प्रवास करणारे प्रवासी अनेकदा येथे थांबतात. यापुर्वी चोरट्यांनी गाडेकर यांची टपरी दोनदा फोडली. दोन्ही वेळी चोरट्यांनी महागडा माल चोरुन नेत पलायन केले होते. दोनदा मालाची चोरी झाल्याने सावध झालेल्या गाडेकर यांनी चोरटे जेथून टपरी फोडतात, त्या ठिकाणी महागडा मजबुत पत्रा लावून घेतला. याशिवाय टपरीतील माल रोज घरी नेण्याची त्यांनी सवय लावून घेतली.

अन् रागाच्या भरात चोरट्यांनी पानटपरीला लावली आग

अन् रागाच्या भरात चोरट्यांनी पानटपरीला लावली आग

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಮಾರ್ಚ್ 28, 2020

टपरीतील ५० हजाराचे फर्निचर जळून खाक

शुक्रवारी रात्री टपरी बंद करुन ते घरी गेले. मध्यरात्रीनंतर चोरट्यांंनी पुन्हा टपरी लक्ष्य केली. यावेळी टपरी फोडण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. टपरी फोडण्यात यश मिळाल्याने आनंदीत झालेल्या चोरट्यांनी टपरीत प्रवेश मिळवला आणि टपरीत चोरीसाठी काही नसल्याने त्यांचा संताप उडाला. त्यांनी बाहेर येत टपरीभोवती सावलीसाठी लावलेला शेडनेट टपरीत टाकून ते पेटवून दिले. त्यामुळे टपरीने पेट घेतला. टपरी पेटल्यानंतर चोरट्यांनी तेथून पलायन केले. त्यामुळे टपरीतील पन्नास हजाराचे फर्निचर जळून खाक झाले. लघुशंकेसाठी उठलेल्या जवळच्या भारत गाडेकर यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी अमित गाडेकर यांना याची माहिती दिली. गाडेकर येईपर्यंत टपरी जळून खाक झाली होती. घटनास्थळी घारगाव पोलिसांनी भेट दिली. दरम्यान या परिसरात चोरट्यांनी दोन दुकाने फोडल्याचे पुढे आले आहे.