घरमहाराष्ट्रमुलीच्या शिक्षणासाठी कर्ज घ्यायला आई बाप येतील तेव्हाच हा देश बदलेल -...

मुलीच्या शिक्षणासाठी कर्ज घ्यायला आई बाप येतील तेव्हाच हा देश बदलेल – पंकजा मुंडे

Subscribe

“मुलीच्या शिक्षणासाठी आणि मुलाच्या लग्नासाठी कर्ज घ्यायला आई बाप येतील तेव्हाच हा देश बदलेल असेल”, असे मत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. त्या पिंपरी-चिंचवड येथे ‘इंद्रायणी थडी’च्या उदघाटन प्रसंगी बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मुलगा जन्माला आला की, त्याचे पेढे वाटून स्वागत केलं जातं. परंतु मुलगी जन्माला आली की आनंद साजरा केला जात नाही. पोटातल्या गर्भात येणाऱ्या स्त्री शक्तीची का पूजा करत नाहीत हा प्रश्न आहे. मुलाच्या शिक्षणासाठी तर मुलीच्या लग्नासाठी आई बाप कर्ज द्या म्हणतात, हे वाक्य फार डोक्यात जातं. फार वाईट वाटतं”, असं मुंडे म्हणाल्या.

“हा देश तेव्हाच बदलेल जेव्हा मुलीच्या शिक्षणासाठी तर मुलाच्या लग्नासाठी आई बाप कर्ज घ्यायला येतील. का तुम्ही मुलाच्या लग्नाला कर्ज घेत नाहीत? मुलाचं लग्न हे मुलीकडील जबाबदारी आहे का? असं त्या म्हणाल्या. महिलांना हुंडा द्यावा लागतो. मुलगी डॉक्टर, इंजिनिअर असेल तरी देखील मुलीकडचे व्यक्ती मुलांकडच्याना वाकून नमस्कार करतात. काही दिवसांनी पुरुष ही आरक्षण मागतील” असं दे,खील मुंडे म्हणाल्या.

- Advertisement -
हे वाचा – धक्कादायक: चॉकलेटमध्ये आढळले किडे

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केवळ घर भरण्याची कामं केली आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने बगलबच्च्यांना पोसण्याचं काम केलं आहे, अशीही टीका मुंडे यांनी केली. यावेळी महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.


हे वाचलंत का – एसटी महामंडळामध्ये ८,०२२ पदांची भरती
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -