घरमहाराष्ट्रप्रवाशांकरता खुशखबर! एकस्प्रेस गाड्यांना विशेष थांबा

प्रवाशांकरता खुशखबर! एकस्प्रेस गाड्यांना विशेष थांबा

Subscribe

मुंबई पंजाब मेल, मुंबई पंचवटी एक्सप्रेस, मुंबई - मनमाड राज्यराणी एक्सप्रेस आणि विशाखापटनम एक्सप्रेस या गाड्यांना आता ठाणे, कल्याण आणि कर्जत या स्थानकांवर विशेष थांबा मिळणार आहे.

एकस्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता आता एक खुशखबर आहे. येत्या १४ ऑगस्टपासून एक्सप्रेस आणि मेल यांना ठाणे, कल्याण आणि कर्जत या स्थानकांवर विशेष थांबा मिळणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या ठाणे, कल्याण आणि कर्जत मार्गावर राहणाऱ्या प्रवाशांना आता दुसऱ्या स्थानकांवर जाण्याची गरज पडणार नसल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोणत्या एक्सप्रेसना मिळणार थांबा

  • गाडी क्रमांक १२१३८ फिरोजपुर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पंजाब मेल ही गाडी मुंबईला येताना सकाळी ६.४८ वाजता ठाणे येथे थांबणार असून ६.५० वाजता ठाणे येथून निघेल.
  • गाडी क्रमांक ११०१० पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पंजाब मेल ठाण्याला सकाळी ०९.०९ वाजता पोहोचणार आणि ०९.११ वाजता ठाणे येथून निघेल.
  • गाडी क्रमांक १२११० मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पंचवटी एक्सप्रेस मुंबईला येताना सकाळी १० वाजता पोहोचणार असून १०.०२ मिनिटांनी ठाण्याहून निघणार.
  • गाडी क्रमांक २२१०१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – मनमाड राज्यराणी एक्सप्रेस मनमाडला जाताना ठाणे येथे १९.२७ येथे पोहचणार असून १९.२९ वाजता ठाण्याहून निघेल.
  • गाडी क्रमांक १८५२० लोकमान्य टिळक टर्मिनस विशाखापटनम एक्सप्रेस डाऊन दिशेने जाणारी गाडी कल्याण येथे ७.४० वाजता पोहोचणार असून ७.२० मिनिटांने येथून सुटेल.

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

या आधी एक्सप्रेसला ठाणे, कल्याण आणि कर्जत या स्थानकांनावर थांबा नव्हता. या एक्सप्रेस स्थानकांवर केवळ तांत्रिक थांबा असल्यामुळे या ठिकाणी उतरण्यास परवानगी नव्हती. मात्र आता या एक्सप्रेसना थांबा मिळाला असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी, सुनील उदासी यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -