घरमहाराष्ट्रमुख्याध्यापिकेचा उफारटा न्याय

मुख्याध्यापिकेचा उफारटा न्याय

Subscribe

विनयभंगाची तक्रार करणार्‍या मुलीला धमकावले

शहरातील जीईआय इंग्लिश मिडियम शाळेमध्ये आठवीत शिकणार्‍या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्यारून तक्रार करणार्‍या मुलीला धमकावल्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या शाळेच्या मुख्याध्यापिकेला अटक करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांना याबाबत पालकांतर्फे गुरुवारी निवेदन देण्यात आले.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार तिच्या पालकांनी मुख्याध्यापिका आणि शाळा व्यवस्थापनाकडे केली होती. मात्र पालकांच्या तक्रारीची दखल न घेता या मुख्याध्यापिकेने उलट या मुलीलाच धमकावून याची कुठेही वाच्यता न करण्याबाबत दमदाटी केली. अगोदरच विनयभंगामुळे हादरलेल्या या मुलीने याबाबत आपल्या पालकांना सांगितले. त्यानंतर 13 फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

पोलिसांनी मुख्याध्यापिका आणि विनयभंग करणार्‍या आरोपी विरोधात भादंवि कलम 354 ड, 506 आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून विनयभंग करणार्‍या आरोपीला अटक केली. मात्र मुख्याध्यापिकेने न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला. कोणत्याही परिस्थितीत समाजाला काळीमा फासणार्‍या घटनेला समर्थन देणार्‍या मुख्याध्यापिकेला जामीन मिळू नये, अशी मागणी यावेळी पालकांतर्फे करण्यात आली. यावेळी तालुक्यातील महिला स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीही उपस्थित होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -