घरमहाराष्ट्रनाशिकसटाणा शहरात पुन्हा तीन कोरोनाबाधित

सटाणा शहरात पुन्हा तीन कोरोनाबाधित

Subscribe

एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच

विरगाव : सटाणा शहरात आज पुन्हा तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. हे तिघे रुग्ण शहरांमधील दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. या उपचारादरम्यान त्यांच्यात कोरोनासदृश्य लक्षणे दिसून आल्याने त्यांचे स्वॅब पुढील तपासणीसाठी पाठविले असता या तिघांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
यामधील दोन रुग्ण हे काळु नानाजी नगरमध्ये वास्तव्यास असून ते पती-पत्नी आहेत, तर तिसरी व्यक्ती हि शहरातील मटन मार्केट परिसरातील असून ती शहरातील एका खासगी दवाखान्यात कामाला असल्याचे समजते. आता सटाणा शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच झाली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -