घरमहाराष्ट्रमुंबई-पुण्यात पुढील तीन दिवस पाऊस

मुंबई-पुण्यात पुढील तीन दिवस पाऊस

Subscribe

ऐन थंडीच्या दिवसात मुंबई, पुणेकरांवर छत्र्याबाहेर काढण्याची वेळ

गेल्या काही दिवसांत राज्यात चांगल्या थंडीला सुरुवात झाली आहे. मात्र, पुढील काही दिवसांत ढगाळ वातावरणामुळं राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील तीन दिवस मुंबईसह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. पुणे शहरातही तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्याच्या दिवसात मुंबई व पुणेकरांना पुन्हा छत्र्याबाहेर काढण्याची वेळ आली आहे. अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईसह कोकण विभागात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी सोमवारी पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील पावसाळी स्थिती ८ जानेवारीपर्यंत कायम राहणार असून, यादरम्यान राज्यात सर्वच विभागांत पावसाची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र आणि वाऱ्यांच्या चक्रीय स्थितीमुळे थंडीच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत हवामानाची विचित्र स्थिती तयार होत आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही राज्यातील बळीराजाला पिके वाचवण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – FRPचं आंदोलन चिघळलं, साखर कारखान्याचं कार्यालय पेटवलं; कागदपत्र जळून खाक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -